नागपुरात पोलीस हवालदाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 00:10 IST2020-09-12T00:09:40+5:302020-09-12T00:10:55+5:30

पल्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला.

Accidental death of a police head constable in Nagpur | नागपुरात पोलीस हवालदाराचा अपघाती मृत्यू

नागपुरात पोलीस हवालदाराचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्दे पल्सर चालकाने दिली धडक : अजनीत अपघात, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पल्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. धनराज पॉल (वय ५२) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदेशी मोहल्ला, कुंजीलाल पेठ येथे राहणारे हवालदार धनराज पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ते आपल्या दुचाकीने रामेश्वरी चौकातून जात होते. चहाच्या दुकानासमोर एका अज्ञात क्रमांकाच्या पल्सर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून हवालदार धनराज यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. पल्सरचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे हवालदार धनराज खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना आजूबाजूच्यांनी मेडिकलमध्ये पोहोचवले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या अपघाताचे वृत्त कळताच पोलिस दलात शोककळा पसरली. हवालदार राजू चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.
घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी पल्सर चालकाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Accidental death of a police head constable in Nagpur