शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 23:07 IST

सामाजिक, साहित्य वर्तुळात शाेक, अहमदाबाद, गुवाहाटीसह अनेक विमानतळ निर्मितीत याेगदान, ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.

निशांत वानखेडे

नागपूर - ज्येष्ठ समाजसेवक, कृषीतज्ज्ञ, शेतकरी नेते, पर्यावरण विषयाचे गाढे अभ्यासक आणि एअरपाेर्ट ऑथाेरिटी ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी अभियंता अमिताभ माेतीराम पावडे यांचे साेमवारी रस्ते अपघातात निधन झाले. ते ६१ वर्षांचे हाेते. अनेक संघटनांशी जुळून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अमिताभ पावडे यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक वर्तुळात शाेककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी माेक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व बराच माेठा आप्तपरिवार आहे.

मूळचे नरखेड तालुक्यातील येरला या गावचे रहिवासी अमिताभ पावडे यांनी नागपुरातल्या केंद्रीय विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणात नियुक्त झाल्यानंतर अनेक वर्षे सेवा दिली. गुजरातच्या अहमदाबादचे विमानतळ, तसेच गुवाहाटी, भाेपाळ व इंदूरच्या विमानतळाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे याेगदान राहिले आहे. एअराेनाॅटिकच्या तांत्रिक बाबतीत निष्णात अभियंता असलेल्या पावडे यांनी आपल्या सेवाकाळात पूर्वाेत्तर राज्यातील २४ विमानतळाच्या नियंत्रणाचे कार्य केले. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत वडिलाेपार्जित शेतीकडून पूर्णवेळ लक्ष दिले. साेबत सामाजिक क्षेत्रातही त्यांची सक्रियता वाढली.

शहराच्या सामाजिक वर्तूळात अत्यंत आदराचे व्यक्तीमत्व असलेल्या अमिताभ पावडे यांनी गांधीवादी व आंबेडकरवादी या एकत्रित विचारांचा समाजसेवेचा वारसा वडील मोतीराम आणि आई कुमूद पावडे यांच्याकडूनच मिळाला होता. आईवडिलांनी धंतोलीत पहिली रात्र शाळा सुरू केली हाेती. विदर्भात पहिला आंतरजातीय विवाह करणाऱ्या मोतीराम आणि कुमूद यांच्या संस्कारामुळे पावडे कुटुंबाने समाजाविषयी नाळ जपली आहे. समाजातले शोषित, वंचित, शेतकरी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांविषयी अमिताभ पावडे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निःस्वार्थी समाजसेवा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी विपूल लेखन केले आहे. ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये त्यांची उपस्थिती असायची.

घराजवळच झाला अपघातअमिताभ पावडे हे धंताेलीतील साठे मार्गावर राहायचे. घराजवळच हा भीषण अपघात झाला. काही खासगी कामानिमित्त सायंकाळी ५. ३० वाजता आपल्या सीडी १०० एम. व्ही. जे ७९०४ या दुचाकीने राठी हॉस्पिटल समोरील चौककडे जात होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एम. एच. ३१ एफ. ई. ६८२४ बुलेटची अमिताभ पावडे यांना धडक बसली. यात गंभीर जखमी पावडे यांना न्युरान हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र मेंदूला झालेल्या अंतर्गत जखमांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धंतोली पोलीसांनी गुन्हा दाखल करीत बुलेट चालकाचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Accidentअपघात