शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनासाठी सेंट्रल रेल्वेची अक्सिडेंट रिलिफ ट्रेन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 10:54 IST

Nagpur : वर्ध्यानंतर आता बल्लारशाह सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्लॅक गोल्डच्या पट्ट्यात आपत्ती व्यवस्थापन बळकट तसेच तत्पर करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागातील बल्लारशाह येथे अक्सिडेंट रिलिफ ट्रेन (एआरटी व्हॅन) तैनात करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे बल्लारशाह रेल्वे स्थानक होय. बल्लारशाह स्थानकावर एकीकडे मध्य रेल्वेचे शेवटचे टोक आहे तर दुसरीकडे दक्षिणेकडील सुरुवात आहे. या स्थानकावरून प्रवाशांसोबतच मालवाहतुकीतूनही मोठा महसूल मिळतो. येथून कोळसा, लोह आणि इतर खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अर्थात बल्लारशाह स्थानकावरून मालगाड्यांची मोठी वर्दळ असते. पॉवर प्लान्ट, अनेक कोळसा खाणी आणि लोह खनिजांची येथून लोडिंग होते. त्यामुळे सुरक्षेचे कडक प्रोटोकॉलसुद्धा या स्थानकावर आहे. तरीसुद्धा कोणत्या न कोणत्या चुकीमुळे कुठल्या ना कुठल्या साईडिंगवर अपघात होतो. अशावेळी तेथे तात्काळ मदत पोहोचवता यावी म्हणून सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेली एआरटी व्हॅन तयार केली आहे. ही व्हॅन आता बल्लारशाह स्थानकावर तैनात करण्यात आली. यामुळे आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत पोहोचविणे शक्य होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे. 

म्हणून झाली व्यवस्था! मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सेंटर यापूर्वी वर्धा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेली एआरटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे. मात्र, बल्लारशाह किंवा आसपासच्या साईडवर कोणती आकस्मिक घटना घडली तर वर्धा तेथून १३२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. त्यामुळे या ट्रेनला तेथे पोहोचण्यास ३ ते ४ तासांचा अवधी लागतो. अशा वेळी आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहोचू शकत नाही. ही बाब काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेवरून लक्षात आली. म्हणून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी तात्काळ मदतीसाठी हे मोबाइल एआरटी युनिट आता बल्लारशाह येथे तैनात केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर