शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

२७६ ग्रॅम सोने घेऊन फरार कारागीर 'हावडा एक्सप्रेस'मध्ये जेरबंद!

By नरेश डोंगरे | Updated: August 18, 2025 19:11 IST

प. बंगालमधून २७ लाखांचे सोने लंपास : सांगली जिल्ह्यातील 'कारागिर' जेरबंद

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पश्चिम बंगालमधील एका सराफा व्यापाऱ्याकडचे तब्बल २७६ ग्राम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढणाऱ्या एका 'कारागिराला' रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने जेरबंद केले. आरपीएफने रविवारी हावडा एक्सप्रेसमध्ये ही सिनेस्टाईल कारवाई केली. अतूल सतीश जाधव (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील बलवन, आठपाडी येथील रहिवासी होय.

पश्चिम बंगालमधील नेहाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असललेल्या एका सराफा व्यावसायिकाकडे अतुल कलाकुसरीचे दागिने तयार करण्याचे काम करीत (कारागिर) होता. १५ ऑगस्टपूर्वी त्याच्याकडे सराफा व्यावसायिकाने नेहमीप्रमाणे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने दिले होते. त्यातील २७६ ग्राम सोने घेऊन सतीशने पत्नी तसेच वडिलांसह पळ काढला. १६ ऑगस्टला तो गायब झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने नेहाटी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली. तो कोलकाता येथून हावडा एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे जात असल्याचे लक्षात येताच नेहाटी पोलिसांनी बिलासपूर कंट्रोल रूमच्या माध्यमातून नागपूर आरपीएफला माहिती दिली. ती कळताच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतीश जाधवचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, वेगवेगळ्या पथकाने हावडा एक्सप्रेसमध्ये शोधमोहिम सुरू केली. गाडी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा जवळ आली असताना पीएसआय दीपक कुमार, के. के. निकोडे आणि सहकाऱ्यांना कोच नंबर बी-७ मध्ये पत्नी आणि वडिलांसह आढळला. त्याला ताब्यात घेऊन गोंदिया चाैकीत नेण्यात आले. 

सोन्याचे बिस्किट, चॉकलेट अन् ...सतीशच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या जवळ चोरीच्या गुन्ह्यात नोंद असलेले सोन्याचे बिस्किट, चॉकलेट असे २७६ ग्राम सोने आढळले. ते जप्त करून नेहाटी (प. बंगाल) पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, तिकडून पोलिस पथक गोंदियाकडे निघाल्याचे समजते.

अनेकदा कारवाई

दुसऱ्या राज्यात गुन्हे करून रेल्वेने नागपूरकडे पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना यापूर्वीही अशाच प्रकारे अटक करण्यात आली असून, या कारवाईनंतर प.बंगाल पोलिसांनी आरपीएफच्या कामगिरीचे काैतूक करून आभार मानल्याचे आरपीएफ आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी पत्रकारांना सांगितले. रेल्वेत अशा प्रकारे रोकड, दागिने, अंमली पदार्थ किंवा मानवी तस्करी करणारे कुणी व्यक्ती आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईनला किंवा आरपीएफला कळवावे, असे आवाहनही आर्य यांनी केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेThiefचोरArrestअटकGoldसोनं