धडधाकट पती पोटगी टाळू शकत नाही: हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 07:52 IST2026-04-02T07:52:42+5:302026-04-02T07:52:42+5:30

पत्नी ही पतीसोबत राहण्यास नकार देऊ शकते, असेसुद्धा न्यायालयाने सांगितले.

Able Bodied Man Cannot Claim Inability to Support Family Bombay HC Orders Alimony | धडधाकट पती पोटगी टाळू शकत नाही: हायकोर्ट

धडधाकट पती पोटगी टाळू शकत नाही: हायकोर्ट

राकेश घानोडे

नागपूर : धडधाकट व्यक्ती कुटुंबाला पोसण्याची क्षमता नसल्याचा दावा करू शकत नाही, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने व्यक्त करून पत्नी व अल्पवयीन मुलाची पोटगी कायम ठेवली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.

या प्रकरणातील पती नागपुरातील रहिवासी असून, या दाम्पत्याचे १९ नोव्हेंबर २०१९ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर कौटुंबिक वादामुळे पत्नीला माहेरी जावे लागले. दरम्यान त्याने पोटगीची जबाबदारी टाळण्यासाठी न्यायालयाला स्वतःच्या उत्पन्नाची माहिती दिली नाही.

कमावत्या पत्नीला पोटगी

पत्नी सुशिक्षित महिला असून, ती अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा देत आहे. ती स्वतः सह मुलाचा सांभाळ करण्याकरिता सक्षम असल्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही, असा मुद्दाही पतीने मांडला होता. न्यायालयाने हा मुद्दादेखील गुणवत्ताहीन ठरवत पत्नी कमावती आहे म्हणून पोटगी नाकारली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

तर पत्नी वेगळी राहू शकते 

सासरी छळ होत असेल, चांगली वागणूक मिळत नसेल आणि सन्मानाने जगण्याची आशा संपली असेल तर पत्नी ही पतीसोबत राहण्यास नकार देऊ शकते, असेसुद्धा न्यायालयाने सांगितले.
 

Web Title : स्वस्थ पति गुजारा भत्ता से बच नहीं सकता: उच्च न्यायालय

Web Summary : बॉम्बे उच्च न्यायालय की नागपुर पीठ ने फैसला सुनाया कि सक्षम पति अपनी पत्नी और बच्चे को गुजारा भत्ता देने से इनकार नहीं कर सकता। अदालत ने पति के इस तर्क को खारिज कर दिया कि उसकी कामकाजी पत्नी को समर्थन की आवश्यकता नहीं है, और जोर दिया कि पत्नी की आय गुजारा भत्ता से इनकार करने का आधार नहीं है अगर उसके साथ दुर्व्यवहार किया जाता है।

Web Title : Healthy Husband Can't Avoid Alimony: High Court

Web Summary : The Nagpur bench of the Bombay High Court ruled that a capable husband cannot deny alimony to his wife and child. The court dismissed the husband's argument that his working wife doesn't require support, emphasizing that a wife's income isn't grounds to deny alimony if mistreated.