शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकमुळे वर्षभराच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरविले

By योगेश पांडे | Published: June 12, 2023 4:32 PM

पत्नी-मुलाची भेट घेऊन निघाला अन् काही वेळातच जगाचा निरोप घेतला

नागपूर : रिफ्लेक्टर नसतानादेखील बेजबाबदारपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रकवर धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचे दोन वर्षांअगोदरच लग्न झाले होते व त्याला एक वर्षांचा मुलगा आहे. बायको-पोराला भेटून परत निघाल्यावर काही वेळातच त्याचा अपघात झाला.पोलिसांनी या प्रकरणात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

धम्मदास सुधाकर गजभिये (३२, डोंगरगाव) असे मृतकाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. धम्मदास रविवारी दिवसभर कामावर होता व सायंकाळी रविवारी सासुरवाडीत पत्नी व मुलाला भेटायला गेला होता. तेथून रात्री आठनंतर तो घरी जाण्यासाठी निघाला.

वर्धा मार्गावरील परसोडी गावाजवळून दुचाकीने जात असताना रस्त्यात एमएच ०६ एक्यू ००९८ हा ट्रक रस्त्यात उभा होता. ट्रकला रिफ्लेक्टर नव्हते व पार्किंग लाईटदेखील लावलेले नव्हते. धम्मदासला ट्रक न दिसल्याने तो त्यावर धडकला. यात गंभीर जखमी झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला एम्समध्ये उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर