कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ बनवून केला बलात्कार

By दयानंद पाईकराव | Updated: June 23, 2023 15:34 IST2023-06-23T15:28:43+5:302023-06-23T15:34:21+5:30

गुन्हा दाखल करून आरोपीस अटक

A woman was raped by making a video while changing her clothes | कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ बनवून केला बलात्कार

कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ बनवून केला बलात्कार

नागपूर : कपडे बदलत असताना एका २८ वर्षीय महिलेचा व्हिडीओ तयार करून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२२ ते २० जून २०२३ दरम्यान घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

राजु लेखाराम पाटील (वय २९, रा. गोडेगाव जि. सिवनी, मध्यप्रदेश ह. मु. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी राजु हा अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा नातेवाईक आहे. त्यामुळे तो नेहमी महिलेकडे येत होता. तो सेंट्रींगचे काम करतो. दीड वर्षांपूर्वी आरोपी राजुने महिला कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ बनविला. त्यानंतर तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन त्याने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वाटेल तेंव्हा महिलेचे शोषण करीत राहिला. २० जूनला दुपारी २.३० वाजता आरोपी राजुने महिलेच्या घरी येऊन तिचे तोंड व गळा दाबून तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्याच्या छळाला कंटाळून महिलेने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अजनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२), (एन), ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

Web Title: A woman was raped by making a video while changing her clothes