सातव्या माळ्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 12:54 IST2022-07-23T12:48:38+5:302022-07-23T12:54:26+5:30

जामठा येथील संदेश सिटीमधील घटना

A woman committed suicide by jumping from the seventh floor in hingna | सातव्या माळ्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; कारण अस्पष्ट

सातव्या माळ्यावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; कारण अस्पष्ट

हिंगणा (नागपूर) : ४२ वर्षीय महिलेने इमारतीच्या सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा (ता. हिंगणा) येथील संदेश सिटीमध्ये शुक्रवारी (दि. २२) रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान घडली.

शुभांगी गाेयल (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीच्या मृत्यूनंतर ती तिच्या दाेन मुलींसाेबत संदेश सिटीमधील स्टेर्लिंग टाईप ई-३ या इमारतीत सातव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहायची. ती वजनमापे तपासणी करणाऱ्या एका खासगी एजन्सीमध्ये नाेकरी करायची. शिवाय, ती शुक्रवारी कामावर न गेल्याने दिवसभर घरीच हाेती. तिने सायंकाळी स्वयंपाकदेखील केला. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दाेन्ही मुली बेडरूमध्ये असताना ती फ्लॅटच्या गॅलरीत आली व कुणाचेही लक्ष नसताना तिने सातव्या माळ्यावरून उडी घेतली. ही बाब लक्षात येताच संदेश सिटीमधील नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: A woman committed suicide by jumping from the seventh floor in hingna