नागपूरमध्ये थरारक स्टंटचा दुर्दैवी शेवट ! बुलेटवर ‘कट’ मारताना भीषण अपघात; दोन १९ वर्षीय तरुणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:56 IST2026-02-17T17:55:32+5:302026-02-17T17:56:45+5:30
Nagpur : वेगाचा अतिरेक ठरला घातक; नागपूरमध्ये दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

A thrilling stunt ends in tragedy in Nagpur! A horrific accident while performing a 'cut' on a bullet; Two 19-year-old youths die
नागपूर : शहरात रात्री उशिरा बेफाम स्टंटबाजी करताना दोन तरुणांचा जीव गेला, आणि या धक्कादायक घटनेने नागपूरकरांमध्ये दुःख आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारच्या रात्री काचिपुरा परिसरातून वर्धा रस्त्यावर बुलेटवरून स्टंट करताना एका महिला दुचाकीस्वाराला कट मारण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण चुकल्याने भीषण अपघात झाला. त्या धडकेत दोन्ही बुलेटस्वार १९ वर्षीय युग विशाल चनकापूर आणि १९ वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी पोहचलेल्या स्थानिकांनी ताबडतोब दोन्ही जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, कारण स्टंटबाजी करताना वाहनधारक वेगवान गतीने सिग्नल जंप करीत होते.
पोलीस तपास करत असून बजाज नगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, हा अपघात पूर्णपणे वेग आणि निष्काळजीपणामुळे झाला आहे. नागपूरमध्ये युवा पिढीचा स्टंटबाजीप्रती वाढता कल आणि रस्त्यावर अशा प्रकारच्या धोकादायक प्रयोगांचा परिणाम पुन्हा एकदा नकळत जीव घेऊन गेला.