महादेवाच्या मंदिरात चोरी करायला गेला अन् कस्टडीतच पोहोचला

By योगेश पांडे | Updated: March 13, 2023 17:11 IST2023-03-13T17:09:07+5:302023-03-13T17:11:48+5:30

आरोपीविरोधात गुन्हा नोंद

A thief who stole money from the donation box of the temple caught red-handed | महादेवाच्या मंदिरात चोरी करायला गेला अन् कस्टडीतच पोहोचला

महादेवाच्या मंदिरात चोरी करायला गेला अन् कस्टडीतच पोहोचला

नागपूर : पहाटेच्या सुमारास मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरून पळणाऱ्या चोरास रंगेहाथ पकडण्यात आले. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पकडल्या गेला.

पंचवटी पार्क येथे ही घटना घडली. त्या परिसरात नर्मदेश्वर महादेव मंदिर असून पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास विकास त्रिवेदी यांना मंदिरातून आवाज आल्याने ते उठले. काही वेळातच मंदिरात पुजा करायला येणाऱ्या गोडबोले यांचा चोर चोर असा आवाज ऐकू आला. त्रिवेदी व परिसरातील इतर नागरिकांना एक चोर मंदिरातून बाहेर पडताना दिसला.

नागरिकांनी पाठलाग करून वस्तीतच चोराला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे दानपेटीतील हजारहून अधिक रुपये आढळून आले. नागरिकांनी हिंगणा पोलीस ठाण्यात माहिती दिली व चोराला तेथे घेऊन गेले. चोराने स्वतःचे नाव कृष्ण गोविंद दास (गजानननगर) असे सांगितले. त्रिवेदी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली.

Web Title: A thief who stole money from the donation box of the temple caught red-handed