दहा दिवसात ५ हजारांची घट! तरीही दागिने खरेदी अजून महागडीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:36 IST2025-06-24T19:35:10+5:302025-06-24T19:36:26+5:30
३% GST सह सोनं एक लाख ४२५ रुपयांवर : सामान्य ग्राहकांना तरीही महागडं

A drop of 5 thousand in ten days! Yet buying jewellery is still expensive
नागपूर : नागपुरात ३ टक्के जीएसटीएसह एक लाख ३ हजार रुपयांवर गेलेले दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोन्याचे भाव मंगळवारी एक लाखापर्यंत कमी झाले. दरकपातीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला असला तरीही अवाजवी दरवाढीमुळे सोने अजूनही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी हे मुख्य कारण समजले जात आहे.
दुसरीकडे प्रति किलो चांदीची विक्री ३ टक्के जीएसटीसह एक लाख दहा हजार रुपयांत सुरू आहे. मात्र, दहा दिवसात चांदीचे दर स्थिर आहेत. १३ जून रोजी जीएसटीविना सोन्याचे भाव १ लाख आणि ३ टक्के जीएसटीसह एक लाख ३ हजारांवर गेले होते. त्यानंतर दर कमी होऊ लागले. २४ जूनपर्यंत सोने ९७,५०० रुपयांपर्यंत कमी झाले. सराफांकडे जीएसटीसह मंगळवारी दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोने एक लाख ४२५ रुपयांत विकल्या गेले. दागिन्यांवर १३ टक्क्यांपासून घडणावळ शुल्क वेगळे आकारले जाते, हे विशेष.