पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: October 18, 2023 16:28 IST2023-10-18T16:25:53+5:302023-10-18T16:28:17+5:30

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

A 12-year-old girl was molested on the pretext of asking for an address | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग

नागपूर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

निखील भास्करराव शेरेकर (२६, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी तिच्या शालेय प्रोजेक्टचे झेरॉक्स काढण्यासाठी घराजवळील दुकानात जात होती. त्यावेळी निखील तेथे आला व त्याने पत्ता विचारला. मुलगी त्याला पत्ता सांगत असताना त्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केला. हे पाहून मुलगी हादरली व तिने आरडाओरड केली. त्यामुळे निखील तेथून पळाला. मुलीने तिच्या पालकांना याची माहिती दिली. तिच्या पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी निखीलविरोधात गुन्हा नोंदवत त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

Web Title: A 12-year-old girl was molested on the pretext of asking for an address