शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

८५ कोटी कोणत्या शाळांना वाटले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीईच्या नोंदणीकृत शाळांना २०१९-२१ या वर्षात ८५ कोटी रुपये दिल्याची लेखी माहिती ...

नागपूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीईच्या नोंदणीकृत शाळांना २०१९-२१ या वर्षात ८५ कोटी रुपये दिल्याची लेखी माहिती नागपुरातील आरटीई फाउंडेशनला दिली आहे. विशेष म्हणजे राज्यातील एकाही शाळेला २०१९-२० या सत्रातील एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे विभागाने ८५ कोटी कोणत्या शाळांना वाटले, असा सवाल आरटीईच्या नोंदणीकृत शाळा संचालकांनी केला आहे. आरटीईचा २०२१-२२ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु, गेल्या चार वर्षांत आरटीईची थकीत प्रतिपूर्ती न मिळाल्याने आरटीई फाउंडेशनने न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील खाजगी विनाअनुदानित तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांत गेल्या चार वर्षांपासून आरटीईचा निधी न मिळाल्याने शाळांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालकांनी फी भरण्यास हात वर केले आहे. यासंदर्भात शासनास वारंवार लेखी निवेदन देऊनही कुठलीच दखल घेतली नाही. आरटीई शाळांना चार वर्षांचा थकीत निधी वाटप करा. नंतरच नवीन सत्रात प्रवेश देण्यात येईल, असे आरटीई फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी शासनाला कळविले आहे. केंद्र सरकारने आरटीईतील आपला ६० टक्के वाटा वेळोवेळी दिल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. २०१२-१३ ते २०१९-२० या वर्षात ४४०.२८ कोटी रुपये केंद्राने राज्याला आरटीईचे दिले आहे. परंतु, राज्य सरकार आपला ४० टक्के वाटा कोणत्या वर्षी किती दिला, याची माहिती माहितीच्या अधिकारात देण्यास टाळाटाळ करीत आहे. राज्यास केंद्राकडून केवळ ४८४.७० कोटीच मिळाले, अशी कबुली देत आहे. त्यामुळे आरटीईच्या निधीसंदर्भात कोण खोटे बोलते आहे, असा प्रश्न फाउंडेशनने उपस्थित केला आहे. शासनाने शाळांना आरटीईच्या प्रतिपूर्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन, नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी त्याचे वाटप करावे. विभागाने प्रवेशाकरिता दबाव वाढविल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका फाउंडेशनने घेतली आहे.