शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

८०० सखी शिकल्या ब्युटी ट्रीटमेंट

By admin | Updated: August 6, 2015 02:48 IST

लोकमत सखी मंच व युनिक स्लिम पॉईंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनीकद्वारे ‘सजना है मुझे’ या विषयावर सेमिनारचे आयोजन डॉ. देशपांडे सभागृहात करण्यात आले होते.

लोकमत सखी मंच व युनिक स्लिम पॉईंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनीकचे आयोजननागपूर : लोकमत सखी मंच व युनिक स्लिम पॉईंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनीकद्वारे ‘सजना है मुझे’ या विषयावर सेमिनारचे आयोजन डॉ. देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. यात मेकअप संदर्भात अ‍ॅडव्हान्स ट्रीटमेंट व करिअर संदर्भात मार्गदर्शन आणि विविध प्रकारच्या मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रिचा जैन यांनी स्वत:चा परिचय देत, ब्युटी पार्लरच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती दिली. ‘सजना है मुझे’ या विषयावर लघुनाट्यही सादर करण्यात आले. या नाटकात ब्युटी क्लिनिकमध्ये असलेल्या स्लिमिंग ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, हाईट ट्रीटमेंट, अ‍ॅडव्हान्स ब्युटी हेअर कोर्स आदी विषय होते. डॉ. रिचा जैन म्हणाल्या की, ब्युटी व हेअर फिल्डमध्ये महिलांनी करियर करताना, सर्वप्रथम बेसिक कोर्ससाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत आपली नोंदणी करावी. यात केवळ १५०० रुपयात ३० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात असिस्टंट ब्युटीशियन, असिस्टंट हेअर स्टाईलिश नावाने दोन बेसिक कोर्स आहेत. हे दोन्ही कोर्स अकादमी आॅफ युनिक इंटरनॅशनल येथे शिकविण्यात येतात. कोर्सनंतर नोंदणीकृत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. सर्व उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १५०० रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. यासाठी ज्यांना आपली नावे नोंदवायची आहे, त्यांनी ८ आॅगस्टपर्यंत आपले नामांकन लोकमत सखी मंचच्या कार्यालयात अथवा युनिक स्लिम पॉईंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिक, गांधीबाग व वर्धा रोडवरील ब्रॅँच आॅफिसमध्ये तसेच युनिक हाईट बिल्डिंग सीताबर्डी येथे करू शकतात. कार्यक्रमात अ‍ॅडव्हान्स मशीनद्वारे स्किन ट्रीटमेंट, रेडिओ लेजरद्वारे अ‍ॅडव्हान्स स्किन ट्रीटमेंट, ग्रीन फेस स्पा, आदीचे सादरीकरण करण्यात आले. टेनक्लिअर ट्रीटमेंटद्वारे त्वचेत होणारे बदल दाखविण्यात आले. यानंतर युनिक स्लिम पॉईंट ब्युटी क्लिनिकच्या स्टाफद्वारे ब्राईडल मेकअप व वेस्टर्न मेकअप करून दाखविले. संचालन सोनल धाबेकर व प्राची सोनटक्के यांनी केले. ममता मून, रजनी, सोनल, इमरान शेख, रिया, सुरेश भरत आदींनी सहकार्य केले. शेवटी डॉ. रिचा जैन द्वारे लकी ड्रॉ काढून तीन महिलांना १००० रुपयांचे गिफ्ट कुपन दिले. लोकमत सखी मंचतर्फे नेहा जोशी यांनी संपूर्ण सहकार्य केले. (प्रतिनिधी)