शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

मध्य प्रदेशच्या सीमेवर ८० लाख पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 9:54 PM

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया करीत शुक्रवारी ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

ठळक मुद्देनिवडणूक पथकाची कारवाई : दोन कार पकडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया करीत शुक्रवारी ८० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमले आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी ३० व ५० लाख अशी ८० लाखांची रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. गुरुवारी देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ७ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले होते, हे विशेष.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर निवडणूक विभागाच्या पथकाला होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.४९ बी.बी. ०८०१ मध्ये ३० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. या पथकातील कृषी अधिकारी रमेश राठोड, ग्रामसेवक भूषण सोमकुवर व गौरव ठाकरे आणि पथकातील सहकाऱ्यांनी मध्य प्रदेशच्या सौसर येथून येणाऱ्या निळ्या रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत पांढऱ्या गुलाबी रंगाची नॉयलॉनची पशु आहाराची बॅग दिसून आली. या बॅगमध्ये ५०० रुपयांच्या २ हजार नोटा असे १० लाख रुपये, शंभर रुपयांच्या १ हजार ८०० नोटा असे १८ लाख व २० रुपयांच्या ५ हजार नोटा असे १ लाख आणि दहा रुपयांच्या दहा हजार नोटा असे एक लाख अशी एकूण ३० लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करून पथकाने गाडी पलाश माहेश्वरी यांच्या ताब्यात दिली.सदरची रक्कम राजेंद्र जितमल सावला रा.सौंसर यांच्याकडून जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक तासानंतर सौंसरकडून एम.एच.३१ ए.जी.६९६१ पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार पथकाला दिसून आली. या कारची तपासणी केली असता डिक्कीत ५० लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही कार कैलाश सुदा रा.बेरडी, मध्यप्रदेश चालवित होता. त्याने ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौंसर शाखेतून काढून कनक कॉटन इंडस्ट्री खैरी पंजाब ता.सावनेर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रक्कम पांढऱ्या नायलॉन बॅगमध्ये ठेवली होती. यासोबतच नोटावर स्टेट बँक, सौंसरचे सील होते. पथकाने याबाबतची माहिती तहसील कार्यालयाला कळविली. यानंतर तहसीलदार दीपक करांडे, नायब तहसीलदार सतीश मसाळ, केळवद ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक द्वारकानाथ गोंदके घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा केली. तहसील कार्यालयाने या घटनेची माहिती आयकर विभागाला दिली. माहिती मिळतात सहायक आयकर आयुक्त अरविंद रेंदे व त्यांचे सहकारी सावनेर तहसील कार्यालयात दाखल झाले. पुढील चौकशी सुरु आहे.पुरावा सोबत ठेवायासंदर्भात उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी विचारणा केली असता १० लाखांहून अधिक रक्कम नेणाऱ्यांनी सर्व कागदपत्र सोबत ठेवावे आणि पथकाला सहकार्य करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMONEYपैसा