जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना केली अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी, ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

By दयानंद पाईकराव | Published: March 23, 2024 08:53 PM2024-03-23T20:53:52+5:302024-03-23T20:54:49+5:30

Nagpur News: जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक करून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

8 gambling accused arrested, performance of Unit 4 of Crime Branch, 79,000 worth of valuables seized | जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना केली अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी, ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना केली अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ ची कामगिरी, ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त

- दयानंद पाईकराव 

नागपूर : जुगार खेळणाऱ्या ८ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक करून त्यांच्या ताब्यातून ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेख ईमरान शेख अकबर (२४, रा. शेषनगर), साबरी मोबीन अंसारी (२३, रा. विजयलक्ष्मी पंडितनगर), सैय्यद इमरान सैय्यद साबीर (२३, रा. कुतुबशहानगर), फैजान शेख कयुम शेख (२३, रा. शिवनकरनगर), शेख अमीर शेख आरीफ (२४, रा. हसनबाग), मुख्तार अली मनावर अली (२३, रा. हसनबाग), अखिल शेख रफीक शेख (३९, रा. बाबा ताजनगर) आणि मुनावर अली रमजान अली(४५, रा. हसनबाग) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी २२ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला नंदनवन ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुनावर अली रमजान अली यांच्या सासुच्या घरी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी जुगार खेळताना आढळले. आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे पत्ते, मोबाईल व रोख असा एकुण ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 8 gambling accused arrested, performance of Unit 4 of Crime Branch, 79,000 worth of valuables seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.