सीताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:10 IST2019-07-14T00:09:18+5:302019-07-14T00:10:05+5:30
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस् उभारण्यात आले आहेत. ज्या भागात काम पूर्ण झाले, तेथे बॅरिकेडस् काढण्यात आले आहेत. बांधकाम निर्धारित वेळेत आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत करण्यात येत आहे. बॅरिकेडस् हटविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.

सीताबर्डी ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्यानागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस् उभारण्यात आले आहेत. ज्या भागात काम पूर्ण झाले, तेथे बॅरिकेडस् काढण्यात आले आहेत. बांधकाम निर्धारित वेळेत आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत करण्यात येत आहे. बॅरिकेडस् हटविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे.
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गालगत गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ भागात व्यापारी बाजारपेठा आहेत. मेट्रोमुळे वाहतुकीच्या समस्या निकाली निघणार आहेत. बाजारपेठांमध्ये वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने काळजी घेतली. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, कॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठांमध्ये जाणे सोईचे होणार आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनदरम्यान ७.६५ कि.मी. मार्गावर एकूण ८ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहेत.
रिच-४ मध्ये झालेले कार्य
पाईल्स १२८४ पैकी १२७०, पाईल कॅप २५० पैकी २४५, २७६ पिल्लरपैकी २१२, पिल्लर कॅप २५९ पैकी १९७, पिल्लर आर्म ४५ पैकी ४१, ट्रक आर्म ४४ पैकी २०, सेगमेंट जोडणी २३९२ पैकी १७५६, सेगमेंट कास्टिंग २३९२ पैकी २०८०, स्पॅन २५९ पैकी १६५ झाले असून गर्डर लाँचिंग कार्य प्रगतिपथावर आहे.