शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
2
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
3
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
4
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
5
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
8
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
11
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
12
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
13
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
14
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
15
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
16
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
17
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
18
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
19
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

७0 गावे रात्रभर अंधारात

By admin | Updated: May 16, 2014 00:52 IST

देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ..

करवाही : देवलापार परिसरातील तब्ब्ल ७0 गावांमधील वीजपुरवठा बुधवारी रात्री ८ वाजता खंडित करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांना अख्खी रात्र अंधारात व गरमीमध्ये काढावी लागली. ब्रेक डाऊनमुळे हा प्रकार घडल्याचे कारण महावितरणच्या अधिकार्‍यांनी पुढे केले आहे.

बुधवारी दिवसभर परिसरातील वातावरण नीरभ्र होते. दिवसभर व रात्री वादळी परिस्थिती नसताना रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातील ७0 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रभर वीजपुरवठा सुरळीत करण्यात न आल्याने लहान मुलांसह अंदाजे ६0 हजार ग्रामस्थांना डासांचा सामना करीत गरमीमध्ये रात्रा काढावी लागली. यासंदर्भात देवलापार येथील कनिष्ठ अभियंता धाबेकर यांच्याशी कारण विचारण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी उर्मटपणे उत्तर दिल्याचे अनेकांनी सांगितले. शिवाय, रात्री ११ नंतर त्यांनी फोन घेणही बंद केले. योग्य कारण न कळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. काहींनी महावितरणच्या रामटेक व नागपूर येथे कार्यालयांत संपर्क साधला, मात्र कुणीही समाधान केले नाही.

हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त व आदिवासीबहुल आहे. या भागात अधिक काळ भारनियमन न करण्याचे निर्देश संबंधितांनी महावितरणच्या कर्मचार्‍यांना दिले आहे. हा परिसर भारनियमनमुक्त करण्यासाठी सिंगल फेज लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मोठमोठे स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारले आहेत. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र, ही संपूर्ण व्यवस्था या भागात कुचकामी ठरली असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात सर्वाधिक भारनियमन हे देवलापर परिसरात केले जाते. या परिसरातील करवाही, मानेगाव (टेक), बांद्रा, खुर्सापार यासह काही गावांमध्ये ब्रेक डाऊनच्या नावावर दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. येथील आदिवासीबांधव आधीच विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असताना महावितरण कंपनीही परिसरातील ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप काहींनी केला. या भागात ब्रेक डाऊनच्या नावावर नेहमीच वीजपुरवठा खंडित केला जातो. हा प्रकार बंद करून हा परिसर भारनियमनमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)