रेल्वेच्या समिक्षा बैठकीला ९ पैकी ६ खासदारांची दांडी; हजारो कोटींच्या कामांचा धडाका

By नरेश डोंगरे | Updated: January 20, 2026 20:17 IST2026-01-20T20:16:53+5:302026-01-20T20:17:42+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे; तीन राज्यात विस्तार : हजारो कोटींच्या कामांचा धडाका : सहा खासदारांऐवजी प्रतिनिधींकडून समिक्षा !

6 out of 9 MPs support Railway review meeting; Works worth thousands of crores to be completed | रेल्वेच्या समिक्षा बैठकीला ९ पैकी ६ खासदारांची दांडी; हजारो कोटींच्या कामांचा धडाका

6 out of 9 MPs support Railway review meeting; Works worth thousands of crores to be completed

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वर्षाला हजारो कोटींचे उत्पन्न देणाऱ्या आणि महाराष्ट्रासह मध्यप्रदेश तसेच छत्तीसगडपर्यंत विस्तारलेल्या दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील कामांची समिक्षा बैठक आज पार पडली. मात्र, या बैठकीला कार्यक्षेत्रातील ९ पैकी ६ खासदार महोदयांनी दांडी मारली. केवळ तीनच खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे कार्यक्षेत्र तीन राज्यात विस्तारलेले आहेत. एकूण ३२४ रेल्वे स्थानके असून या ठिकाणांहून ९६२ गाड्यांचे रोज संचलन केले जाते. प्रवासी आणि मालवाहतुकीतून दपूम रेल्वेला रोज कोट्यवधींचा महसूल मिळतो. कामकाजाचे सुलभीकरण आणि संचलन करण्यासाठी दपूमची नागपूर, बिलासपूर आणि रायपूर या तीन ठिकाणी स्वतंत्र विभागीय कार्यालये आहेत. एकट्या नागपूर विभागाचा विचार केल्यास सुरू असलेल्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केवळ २८७ दिवसांत एकट्या मालवाहतुकीतून २३ हजार, ६५५ कोटींचा महसूल नागपूर विभागाला मिळाला आहे. यावरून येथील आर्थिक उलाढालीची प्रचिती यावी. सध्य स्थितीला या तीन विभागात अमृत भारत स्टेशन योजनेसह रेल्वेच्या वेगवेगळ्या योजनांची हजारो कोटींची कामे सुरू आहेत. या कामांची तसेच प्रत्यक्ष स्थितीची माहिती देण्यासाठी तसेच खासदारांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेण्यासाठी नागपूर, बिलासपूर आणि रायपूर क्षेत्रातील खासदारांसोबत दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांची समिक्षा बैठक आज २० जानेवारीला सदरमधील हॉटेल तुली येथे आयोजित करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाकडून बैठकीची आधीच तयारी करण्यात आली होती. त्यानुसार, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांच्यासह ठिकठिकाणचे शिर्षस्थ रेल्वे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मात्र बैठकीला छिंदवाडाचे खासदार बंटी विवेक साहू, रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे आणि भंडारा–गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे तीनच खासदार उपस्थित होते. अत्यावश्यक कामांमुळे नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार कृष्णा खोपडे यांना बैठकीला पाठविले. तर, मंडला येथील खासदार डॉ. फग्गनसिंह कुलस्ते, राजनांदगावचे खासदार संतोष पांडेय, गडचिरोली–चिमूरचे खासदार नामदेव किरसान, बालाघाटच्या खासदार भारती पारधी तसेच जबलपूरच्या खासदार सुमित्रा बाल्मिक आदी खासदार मात्र बैठकीला अनुपस्थित राहिले.

प्रतिनिधींनी केली समिक्षा

खासदार डॉ. कुलस्ते यांचे प्रतिनिधी म्हणून अंजनी तिवारी, खासदार पांडेय यांचे प्रतिनिधी विनोद खांडेकर, खासदार किरसान यांचे प्रतिनिधी अमेय निनावे, खासदार पारधी यांचे प्रतिनिधी अभय कोचर आणि खासदार बाल्मिक यांचे प्रतिनिधी जी. एस. ठाकूर यांनी आजची समिक्षा बैठक सांभाळली. नमूद खासदार महोदयांच्या वतिने याच प्रतिनिधींनी तीनही राज्यातील दपूम रेल्वेच्या क्षेत्रात सुरू असलेल्या हजारो कोटींच्या कामांचा आढावा घेतला. कुठे काय हवे, काय नको, त्यावर सूचनांचे आदान प्रदान केले.


 

Web Title : रेलवे समीक्षा बैठक में नौ में से छह सांसद अनुपस्थित; हजारों करोड़ की परियोजनाएँ

Web Summary : दक्षिण पूर्व मध्य रेलवे की समीक्षा बैठक में सांसदों की कम उपस्थिति रही। हजारों करोड़ की परियोजनाओं के बावजूद, केवल तीन सांसद उपस्थित थे। प्रतिनिधियों ने अनुपस्थित लोगों की जगह ली और तीन राज्यों में चल रहे रेलवे कार्यों की समीक्षा की।

Web Title : Six of Nine MPs Miss Railway Review Meeting; Crores of Projects

Web Summary : A South East Central Railway review meeting saw low MP attendance. Despite thousands of crores in projects, only three MPs attended. Representatives filled in for absentees, reviewing ongoing railway works across three states.