शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

भरधाव कारला बसची धडक, वृद्धासह पाच जबर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 16:18 IST

भरधाव कारला स्टार बसची धडक बसल्याने कारमधील दोन वृद्धांसह पाच जण जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी हिंगणा-एमआयडीसी परिसरात हा अपघात घडला.

ठळक मुद्देहिंगणा परिसरात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भरधाव कारला स्टार बसची धडक बसल्याने कारमधील दोन वृद्धांसह पाच जण जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी हिंगणा-एमआयडीसी परिसरात हा अपघात घडला.

वसंता चहांदे (वय ६५), भोजराज राजाराम मेश्राम (वय ६२), बाळू मेश्राम (वय ५०), मनोज बागडे (वय ५०, सर्व रा. अजनी) आणि महेंद्र मेश्राम (वय ४०, रा. बालाजीनगर) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. हे सर्वजण मोहगाव झिल्पी (हिंगणा) येथील एका संपर्कातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेत गेले होते. दुपारी ३.३० च्या सुमारास ते कारमधून परत येत होते. हिंगण्याच्या वासुदेवनगरात येताच मागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने कारला धडक मारली. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्टार बसची कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कारचालक बाळू मेश्रामसह पाचही जण जबर जखमी झाले.

बसमधील प्रवासी आणि परिसरातील सेवाभावी मंडळींनी जखमीची मदत केली. एमआयडीसी पोलिसांना कळविले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर एमआयडीसी पोलिसांनी रात्री या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद केली.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी