शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मालमत्ताकराची ४८० कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 22:18 IST

नागपूर शहरात जवळपास ५ लाख ४० हजार मालमत्ता आहे. यातील ३ लाख ८७ हजार १०७ मालमत्ताधारकांकडे तब्बल ४८० कोटींची थकबाकी आहे.

ठळक मुद्दे३.८७ लाख मालमत्ताधारक थकबाकीदार : ३५१ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लवकरच लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिके च्या मालमत्ता कर विभागाच्या रेकॉर्डनुसार नागपूर शहरात जवळपास ५ लाख ४० हजार मालमत्ता आहे. यातील ३ लाख ८७ हजार १०७ मालमत्ताधारकांकडे तब्बल ४८० कोटींची थकबाकी आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय मालमत्तांचाही समावेश आहे.मागील अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्यांकडून वसुलीसाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. देयके वेळेवर मिळत नसल्याची नागरिकांची दरवर्षी तक्रार असायची परंतु २०१९-२० या वर्षातील देयकाचे वाटप पूर्ण झाले आहे. यामुळे वसुलीत वाढ झाली आहे. १९ ऑगस्टपर्यंत ७५ कोटींची वसुली झाली आहे. १ लाख ५० हजार ७३४ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यात नियमित कर भरणाऱ्या ९४ हजार ६९२ मालमत्ता धारकांनी ४८ कोटी तर थकबाकी वसुलीतून २७ कोटी वसुलीतून जमा झाले. मागील वर्षात याच कालावधीत ४८ कोटींची वसुली झाली होती. या तुलनेत यंदा वसुली २७ कोटींनी वाढली आहे.शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची संख्या ५४ हजार ४२ इतकी आहे. अशा थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून विक्री केली जाते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३५१ मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. या मालमत्तांचा लवकरच लिलाव के ला जाणार असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.१२० मालमत्ता मनपाच्या नावावर करणारवर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंट बजावले, जप्तीची कारवाई करून लिलाव करण्यात आला. मात्र लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच थकबाकीदारांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अशा १२० मालमत्ता आता महापालिके च्या नावावर केल्या जात आहेत. यातील काही मालमत्ता मनपाच्या नावावर करण्यात आल्या आहेत३५१ मालमत्तांचा लिलाव करणारवर्षानुवर्षे कर थकीत असणाऱ्या ३५१ मालमत्ताधारकांकडे २६ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे. मालमत्ता जप्तीची नोटीस बजावल्यानंतरही या मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.खुल्या भूखंडधारकांनी देयके प्राप्त करावीमालमत्ताधारकांना देयकांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु खुल्या भूखंडधारकांना देयक वाटप करताना अडचणी येतात. बहुसंख्य भूखंडधारक दुसरीकडे वास्तव्यास असल्याने त्यांना देयके वाटप करता आलेली नाही. अशा खुल्या भूखंडधारकांनी झोन कार्यालयातून आपली देयके प्राप्त करून कर भरावा असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर