राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द
By नरेश डोंगरे | Updated: December 1, 2023 21:54 IST2023-12-01T21:54:33+5:302023-12-01T21:54:50+5:30
४ गाड्यांचा प्रवास अर्धवट; तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार : हजारो प्रवाशांना होणार मनस्ताप

राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द
नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या राजनांदगाव आणि कन्हान दरम्यान सुरू असलेल्या थर्ड रेल्वे लाईन वर्कचा फटका या मार्गावरील ४८ रेल्वे गाड्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर, या ४८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, ४ गाड्यांचा प्रवास अर्धवट राहणार आहे. तर, तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत. यामुळे आधीच प्रवासाचे नियोजन करून असलेल्या हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होणार आहे.
नागपूर नजिकच्या कन्हान तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे २ ते१४ डिसेंबरपर्यंत नॉन इंटरलॉकिंग वर्क करण्यात येणार आहे. त्यासाठी या अवधित खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गोंदिया-इतवारी मेमू, इतवारी-गोंदिया मेमू, इतवारी-रामटेक मेमू, रामटेक-इतवारी मेमू, रायपूर - ईतवारी पॅसेंजर स्पेशल, इतवारी-तिरोड़ी पॅसेंजर स्पेशल, तिरोड़ी-तुमसर पॅसेंजर स्पेशल, इतवारी रायपूर पॅसेंजर स्पेशल, तिरोड़ी-इतवारीपॅसेंजर स्पेशल, टाटानगर इतवारी एक्सप्रेस, इतवारी टाटानगर एक्सप्रेस, हावडा - छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस - हावडा एक्सप्रेस, बिलासपूर भगत की कठी एक्सप्रेस,भगत की कोठी बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर - बिकानेरर एक्सप्रेस, बिकानेर - बिलासपूर एक्सप्रेस, ओखा-शालीमार एक्सप्रेस, शालीमार-ओखा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल पुरी एक्सप्रेस, पुरी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल- हटिया एक्सप्रेस, तिरूनेलवेली बिलासपूर एक्सप्रेस, बिलासपूर तिरूनेलवेली एक्सप्रेस, संतरागाछी-पुणे एक्सप्रेस, पुणे-संतरागाछी एक्सप्रेस, विशाखापट्टनम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-विशाखापट्टनम एक्सप्रेस, गांधीधाम-पुरी एक्सप्रेस, पुरी-गांधीधाम एक्सप्रेस, पुरी-अजमेर एक्सप्रेस, अजमेर-पुरी एक्सप्रेस, रीवां-इतवारी एक्सप्रेस, इतवारी- रीवां एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्यांचा रद्द गाड्यांमध्ये समावेश आहे.
अर्धवट प्रवास करणाऱ्या गाड्या
४ ते १२ डिसेंबर दरम्यान धावणारी ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, ६ ते १४ डिसेंबर दरम्यान ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल. ५ ते १३ डिसेंबर पर्यंत १२१०५ मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. ६ ते १४ डिसेंबरपर्यंत धावणारी १२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.
उशिरा सुटणाऱ्या गाड्या
याच कामाचा फटका बसल्याने काही गाड्या प्रवासाला सुरूवातच उशिरा करणार आहेत. त्यात ६ ते ९ डिसेंबर दरम्यान धावणारी इतवारी कोरबा शिवनाथ एक्सप्रेस ही गाडी इतवारी (नागपूर) स्थानकावरून २ तास उशिरा धावेल. ८ आणि ९ डिसेंबरला १२८०८ निजामुद्दीन विशाखापट्टनम समता एक्सप्रेस ही गाडी निजामुद्दीन स्थानकावरून १ तास ३० मिनिटे उशिरा प्रवास सुरू करेल तर ९ डिसेंबरला साईनगर शिर्डी - हावडा एक्सप्रेस साईनगर शिर्डी येथून ३० मिनिटे उशिरा निघणार आहे.