जिल्ह्यात ४१.९९ टक्के जलसाठा

By Admin | Updated: June 29, 2014 00:47 IST2014-06-29T00:47:15+5:302014-06-29T00:47:15+5:30

पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक

41.99 percent water stock in the district | जिल्ह्यात ४१.९९ टक्के जलसाठा

जिल्ह्यात ४१.९९ टक्के जलसाठा

राजेंद्र मुळक यांनी घेतला आढावा : पाणी काटकसरीने वापरा
नागपूर: पावसाने दडी मारल्याने उद््भवलेल्या परिस्थितीचा जलसंपदा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आढावा घेतला. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शनिवारी सिंचन भवनात मुळक यांनी आढावा बैठक घेतली.
बैठकीला विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी. शुक्ला,मुख्य अभियंता ए.एन. खापरे, सहायक मुख्य अभियंता के.एस. वेमुलकोंडा, कार्यकारी अभियंता एस.बी. तेलंग, व महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीत अधिकाऱ्यांनी अमरावती व नागपूर विभागातील धरणातील जलसाठ्याची माहिती दिली. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यात ४१.९९ टक्के गोंदिया जिल्ह्यात १९.७ टक्के, चंद्रपूर २०.६८ टक्के ,गडचिरोली २८.४१ टक्के, भंडारा ७२.५४ टक्के आणि वर्धा जिल्ह्यात ील धरणात ३०.७६ टक्के पाणी साठा आहे.
पाण्याची उपलब्धता पाहता मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी स्थिती उत्तम आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेला तरी परिस्थिची हाताबाहेर जाणार नाही, असा विश्वास मुळक यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)

Web Title: 41.99 percent water stock in the district