शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

नागपुरात दक्षिण एक्स्प्रेसमधून ३.५० लाखाचे बनावट दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:29 PM

दक्षिण एक्स्प्रेसमधून बनावट दागिने आणि महागड्या दगडांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक केली आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमधून बनावट दागिने आणि महागड्या दगडांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक केली आहे.मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, डी. डी. वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसच्या कोच एस-२ मध्ये ६६, ६७ बर्थवर २ व्यक्ती बसलेले दिसले. शंकेच्या आधारे त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपले नाव मनोज, किशन लाल रा. जयपूर सांगितले. त्यांच्या जवळील बॅगबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात बनावट दागिने, दागिन्यात वापरावयाचे महागडे दगड किंमत ३.५० लाख आढळले. आरोपींना मुद्देमालासह आयकर विभागाच्या सुपूर्द करण्यात आले आहे.१७ किलो गांजा पकडलारेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसने होत असलेली १७ किलो गांजाची तस्करी पकडून दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गठित केलेल्या गुन्हे शाखेच्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक शिवराम सिंह, दीपक वानखेडे, विजय पाटील, किशोर चौधरी हे शनिवारी सकाळी ९.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक १ वर उभ्या असलेल्या १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी करीत होते. त्यांना एक महिला आणि पुरुष संशयास्पद स्थितीत बसलेले आढळले. त्यांनी आपले नाव संतोष होतमसिंह परमार (२२) रा. धौलपूर राजस्थान आणि रोशनीदेवी प्रदीप कुमार (३०) रा. आग्रा उत्तर प्रदेश सांगितले. त्यांच्याजवळील बॅगची तपासणी श्वान रेक्सद्वारे केली असता श्वानाने त्यात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. आरोपींजवळील बॅगमध्ये १ लाख ७० हजार रुपये किमतीचा १७ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळला. जप्त केलेला गांजा आणि आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.२०० दारूच्या बॉटल्सही जप्तरेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा हा प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत असताना दक्षिण एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळला. त्याने आपले नाव सुमित सुकदेव येसनसुरे (२२) रा. रवींद्रनगर वॉर्ड, बल्लारशा सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २,७४७ रुपये किमतीच्या १०२ बॉटल्स आढळल्या. दुसऱ्या घटनेत विकास शर्मा यास सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळला. त्याने आपले नाव गौतम देवानंद लोणारे (२३) महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारशा सांगितले. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता, त्यात दारूच्या २,६०० रुपये किमतीच्या १०१ बॉटल्स आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर