शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांच्या भ्रमंतीत ३,०१७ किमीचा प्रवास : ‘त्या’ वाघाची रेडिओ कॉलर वनविभागाने काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 21:53 IST

मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देज्ञानगंगा अभयारण्यात बस्तान : यापुढे कॅमेरा ट्रॅपने ठेवणार नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. आता त्याचे अधिवास क्षेत्र निश्चित झाल्याने यापुढे त्याच्यावर कॅमेरा ट्रॅपने नजर ठेवली जाणार आहे.टिपेश्वर अभयारण्यातील सी-१ या वयात आलेल्या वाघाला फेब्रुवारी-२०१९ मध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. तेव्हा तो टिपेश्वर अभयारण्यात होता. त्यानंतर जून -२०२० पर्यंत तो याच परिसरात होता. मात्र त्यानंतर त्याने स्वतंत्र अधिवासाचा शोध घेणे सुरू केले. आदिलाबाद, महाबळेश्वर, पुन्हा आदिलाबाद, पैनगंगा, इसापूर, वाशीम असा १४ महिन्याच्या काळात ३,०१७ किलोमीटर भ्रमंती करून आता तो ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे.व्याघ्र अभ्यासकांच्या मते, त्याने हे क्षेत्र आपल्या सुरक्षित अधिवासासाठी निवडले आहे. या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते तेव्हा तो लहान होता, तसेच त्याचा अधिवास निश्चित व्हायचा होता. आता तो मोठा झाला असून अधिवासही निश्चित झाला आहे. यासंदर्भात प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी बुधवारी दुपारी माध्यमांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून, त्यात या वाघाला लावलेले कॉलर काढल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरीही आता संपण्याच्या बेतात आली होती. तसेच मानेभोवती लावलेले रेडिओ कॉलर वाढत्या वयात घट्ट होऊन भविष्यात त्याच्या मानेला इजा होण्याची शक्यता होती. त्यामुळे २८ मार्चला रिमोटच्या साह्याने त्याला लावलेले कॉलर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तब्बल १४ महिने ३,०१७ किलोमीटर फिरून एखाद्या वाघाने आपला अधिवास निश्चित करणे ही निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या निमित्ताने आम्हा सर्वांसाठीच ही नवीन माहिती मिळाली आहे. नितीन काकोडकर, प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव)अशा काढतात रेडिओ कॉलरवाघाला रेडिओ कॉलर लावताना पकडून व बेशुद्ध करून तो लावला जातो. मात्र काढताना त्याला पकडण्याची गरज नसते. वाघापासून १०० मीटर अंतरावर थांबून रिमोटच्या साह्याने ती काढली जाते. रिमोटची कळ दाबताच त्याच्या गळ्यातील पट्टा (कॉलर) निसटून खाली पडतो.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग