शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बालसुधार गृहातून ३० मुले पळाली

By admin | Updated: April 25, 2016 02:33 IST

जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली.

कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट फेकले; मारहाणही केलीनागपूर : जरीपटक्यातील बाल सुधार गृहाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३० मुले पळून गेली. पळून गेलेल्यात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे शासकीय बाल सुधार गृह आहे. तेथे अनाथ, पोलिसांना सापडलेली तसेच विविध गुन्ह्याच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलांना ठेवले जाते. सकाळी आणि रात्री जेवणाच्या वेळी त्यांना पुरती मोकळीक मिळते. रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास जेवणाची तयारी सुरू असताना त्यांना नेहमीप्रमाणे एकत्रित करण्यात आले. यावेळी बाल सुधार गृहात सुरक्षा रक्षकासह मोजकेच कर्मचारी होते. ही संधी साधून काही मुलांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि काहींनी कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत सुधार गृहातून पलायन केले. तब्बल ३० मुले सुधार गृहातून पळाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी सुधार गृहाच्या व्यवस्थापकांना कळविले. त्यांनी जरीपटका पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी वायरलेसवरून शहरातील सर्व ठाण्यांना माहिती देऊन संशयास्पद अवस्थेत दिसणाऱ्या मुलांना पकडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर हादरलेल्या शहर पोलीस यंत्रणेने विविध भागात कसून तपास सुरू केला. जागोजागी नाकाबंदी केली. (प्रतिनिधी)अनेक जण चड्डी-बनियानवर पळालेल्या मुलांमध्ये खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि सुधार गृहात ठेवलेल्या काही बाल आरोपींचाही समावेश आहे. जेवणाच्या वेळी अनेक मुले चड्डी किंवा बरमुडा अन् बनियानवर असतात. तशाच अवस्थेत त्यांनी येथून पळ काढला. त्यांना शोधण्याचे काम पोलीस करीत होते. ९ परतले, १० पकडलेपळून गेलेल्यांपैकी काही वेळेतच ९ मुले स्वत:हून सुधार गृहात परतली तर, १० मुलांना वेगवेगळ्या भागात पकडण्यात आले. ११ जणांचा जागोजागी शोध घेतला जात होता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांना मारहाण करून गिट्टीखदानमधील एका सुधार गृहातून काही मुले पळून गेली होती. त्यात शहरातील सर्वच सुधार गृह, अनाथालयातून अधूनमधून मुले पळून जातात.