शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

२६ कोटींचा सिगारेटचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 05:13 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न विभागाने ‘कोटपा’ कायद्यांतर्गत दोन नामांकित कंपन्यांच्या गोडाऊनवर धाड

 नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न विभागाने ‘कोटपा’ कायद्यांतर्गत दोन नामांकित कंपन्यांच्या गोडाऊनवर धाड टाकून २६ कोटी ७१ लाख ८ हजार रुपये किमतीचा सिगारेटचा साठा जप्त केला. नागपूर विभागात विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई संपूर्ण राज्यात सुरू आहे. आयटीसी आणि गाडफ्रे फिलिप्स इंडियाचे गोडाऊन सीलकेंद्र सरकारच्या ‘कोटपा’ कायद्यातील वैधानिक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून नागपूर विभागाने आयटीसी लिमिटेड आणि गाडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या दोन नामांकित सिगारेट कंपन्यांच्या गोडाऊनवर सोमवारी धाड टाकली. आयटीसी कंपनीच्या कळमेश्वर तालुक्यातील मौजा निमजी येथील लॉजिस्टिक पार्कमधील गोडाऊनमधून २२ कोटी ८५ लाख ५७ हजार ६५८ रुपये किमतीची सिगारेट जप्त केली. यात मुख्यत्वे ब्रिस्टॉल, विल्स, गोल्ड फ्लॅग, क्लासिक आदींसह ४० ब्रॅण्डच्या सिगारेटचा समावेश आहे. तर गाडफ्रे फिलिप्स इंडियाच्या वाडी येथील रेनबो एन्टरप्राईजेसवर धाड टाकून ३ कोटी ८५ लाख ४९ हजार २८१ रुपये किमतीची सिगारेट जप्त केली. त्यात मुख्यत्वे मालब्रो, फोर स्क्वेअर आदींसह २२ ब्रॅण्ड सिगारेटचा समावेश आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबईचे सहआयुक्त (दक्षता) हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) न.रं. वाकोडे आणि एम.सी. पवार यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम, अभय देशपांडे, ललित सोयाम, आनंद महाजन, अखिलेश राऊत, प्रवीण उमप, अमित उपलप यांनी केली.