शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचे २५० कोटी नासुप्रकडून घेणार

By admin | Updated: December 30, 2015 03:18 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांच्या भरवशावर ३५०० कोटी रुपयांची कामे करण्याची तयारी करण्यात आली आहे.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय : राज्य शासनापुढे ठेवणार प्रस्तावनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांच्या भरवशावर ३५०० कोटी रुपयांची कामे करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी अविकसित ले-आऊट नियमित करण्यासाठी १२० रुपये प्रति वर्गफूट शुल्क आकारण्यात येईल. याशिवाय लँडपुलिंगच्या मदतीने जमा होणारी जमीन आदींची विक्री करून निधी जमविला जाणार आहे. तरीही मनपाला आपल्या हिश्श्यातून २५० कोटी रुपये पाच वर्षात लावावयाचे आहे. स्मार्ट सिटीमध्ये सामील आऊटर भाग हे नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात येतात. यामुळे मनपाच्या हिश्श्याचे २५० कोटी रुपये नासुप्रद्वारा चुकते करण्यात यावे, अशी मागणी केली जाईल, असा निर्णय मंगळवारी आयोजित मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सर्वसंमतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. विरोधी पक्षानेही स्मार्ट सिटीची संकल्पना योग्य असल्याचे सांगितले, परंतु त्याच्या अंमलबजावणीवर मात्र शंका उपस्थित केली. नासुप्रतर्फे २५० कोटी रुपये चुकविले जाण्याचा प्रस्ताव मनपातर्फे राज्य शासनाला पाठवून उपयुक्त दिशानिर्देश जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी स्मार्ट सिटीवर सभागृहात मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर नगरसेवकांनी काही सूचना केल्या. तर काही नगरसेवकांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. चर्चेत सहभागी बहुतांश नगरसेवकांनी अविकसित ले-आऊटसाठी नासुप्रला थेट जबाबदार ठरविले. स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या संतुलित विकासावर लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रेझेंटेशनदरम्यान आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्प चरणबद्ध पद्धतीने अमलात आणला जाईल. यासाठी सर्वप्रथम अविकसित ले-आऊटवर लक्ष दिले जाईल. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी ३३५१ कोटी रुपये आणि पॅन सिटी प्रकल्पासाठी २२३ कोटी खर्च करण्याची योजना आहे. पहिल्या चरणात भरतवाडा, पुनापूर, पारडी येथील ३.८५ वर्ग किमीचे क्षेत्र विकसित केले जाईल. त्यानंतर नारा-नारी आणि तिसऱ्या चरणात मानेवाडा, बाबुळखेड्याचा विकास करण्यात येईल. १२.५० वर्ग किमी क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. १३ सदस्यीय स्पेशन पर्पज व्हेईकल (एसपीवी) ची स्थापना करण्यात येईल. ही यंत्रणा स्मार्ट सिटी प्रकल्पावर लक्ष ठेवेल. (प्रतिनिधी)