२५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:20 IST2026-03-25T17:20:01+5:302026-03-25T17:20:54+5:30

Nagpur : २५ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालक अलोक चौधरी व संजय चौधरी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आणि ११ अटक आरोर्पीचे नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले.

25 workers killed in SBL blast; 13 accused denied bail | २५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला

25 workers killed in SBL blast; 13 accused denied bail

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
२५ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालक अलोक चौधरी व संजय चौधरी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आणि ११ अटक आरोर्पीचे नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.

अटक आरोपींमध्ये चंद्रशेखर रजवाड, विलास माळवे, सुधाकर उपरकर, राजेंद्रकुमार पारधी, पंकज पांडे, रोशन राऊत, संदीप सोलंकी, प्रदीप शर्मा, नीलकमल डोंगरे, रवी कामरा व राकेश तिवारी यांचा समावेश आहे. सध्या गंभीर जखमी १७ कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोसिव्ह, कास्ट बूस्टर आदी स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये १ मार्च २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास विध्वंसक स्फोट झाला. ही कंपनी राऊळगाव शिवारात कार्यरत होती. कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही हृदयद्रावक घटना घडल्याचा अहवाल पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रिज सेफ्टी अँड हेल्थ यांनी दिला आहे. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी एकूण ३२ आरोपींविरोधात बीएनएस कलम १०५, १२५ (अ) व (ब), २८८ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे व अभियोग सहायक संचालक अॅड. मैथिली काळवीट यांनी बाजू मांडली.

अलोक अवधिया हायकोर्टात

काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने विरोधात निर्णय दिल्यामुळे आरोपी संचालक अलोक राधेश्याम अवधिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी त्यांच्या अर्जावर राज्य सरकारला नोटीस बजावून ३० मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. अवधिया यांच्यातर्फे वरिष्ठ अॅड. महेश जेठमलानी व अॅड. आदित्य चौधरी यांनी बाजू मांडली.

Web Title : एसबीएल विस्फोट मामला: 13 आरोपियों को जमानत नहीं, 25 की हुई थी मौत

Web Summary : एसबीएल एनर्जी विस्फोट मामले में 13 आरोपियों की जमानत खारिज। सुरक्षा उल्लंघन के कारण हुई घटना में 25 श्रमिकों की जान गई थी। एक आरोपी ने हाईकोर्ट में अपील की है। मामले की जांच जारी है।

Web Title : SBL Blast Case: Bail Denied to 13 Accused in Fatal Incident

Web Summary : Court rejects bail for 13 accused in the SBL Energy blast case that killed 25 workers. The incident, caused by safety violations, is under investigation, with one accused appealing to the High Court.