नागपुरात बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:34 IST2019-11-13T22:32:49+5:302019-11-13T22:34:30+5:30
चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले.

नागपुरात बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले. पोलीस सूत्रानुसार प्रॉपर्टी डीलर मिलिंद जोशी सहकारनगरातील करुणेश्वर मंदिराजवळ राहतात. ते ४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबासह बहिणीच्या घरी मुंबईला गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेले ८६५ ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले. लॉकरची चावी सुद्धा घरीच होती. चोरांनी सहजपणे रोख ७० हजार व दगिन्यावर हात साफ केला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री जोशी नागपूरला आले. यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.