नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 08:38 PM2020-06-20T20:38:50+5:302020-06-20T20:41:44+5:30

घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

2.30 lakh burglary in Raghujinagar, Nagpur | नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी

नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारकर्ते कुणाल विनायकराव गाढवे (३६ ) हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले होते. तर त्यांची पत्नी व वडील हे बँकेत खाते काढण्यासाठी रेशीमबाग येथे गेले होते. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला सेफ्टी लॉक तसेच दरवाजाला बाहेरून स्टीलचा लॉक लावला होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दाराला लावलेले कुलूप व सेफ्टी लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटामध्ये सोन्याचे दागिने व ९५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.
 

Web Title: 2.30 lakh burglary in Raghujinagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.