घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड

By योगेश पांडे | Updated: June 30, 2023 14:15 IST2023-06-30T14:09:25+5:302023-06-30T14:15:57+5:30

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

21 tola gold-diamond jewelery missing from the house, when did the thieves enter the house? | घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड

घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड

नागपूर : एका व्यक्तीच्या घरातील कपाटात ठेवलेले २१ तोळे वजनाचे सोने-हिऱ्याचे दागिने चोरट्यांनी उडवले. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरी झाली व चोरट्यांनी साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. 

चमनसिंग सैदानीसिंग चितोडीया (४०, गजानन नगर, सेंट जोसेफ स्कुल समोर, पिठेसुर रोड) यांच्या पत्नीने २ जून रोजी घरी २१६ ग्रॅम सोन्याचे दागिने व एक हिऱ्याचा हार असे दागिने घरातील लोखंडी कपाटात रेकझीनच्या पॉकेटमध्ये ठेवले होते. २९ जून रोजी दुपारी साडे चार वाजता त्या त्यांच्या भावाच्या घराच्या वास्तु कार्यक्रमाकरीता जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी सोन्याचे दागिने पाहीले असता त्यांना तेथे ते आढळले नाही.

अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व एक हिऱ्याचा हार, असा एकुण ८ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चितोडीया यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापुर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. २७ दिवसांत चोरटे नेमके कधी घरात शिरले व चोरी केली याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Web Title: 21 tola gold-diamond jewelery missing from the house, when did the thieves enter the house?