शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:46 IST

Nagpur : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला

Crime News: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी सगळीकडे होत आहे. संपूर्ण महाराष्टातील नागरिक या घटनेविरोधात संतप्त आहेत. आरोपीची पाशवी वृत्ती पाहता शिक्षेसाठी त्याला लोकांमध्ये सोडून देण्याची मागणी होत आहे. 

याच घटनेवरून आठवण होते नागपूरमध्ये घडलेल्या अशा आक्रोशाची ज्याने संपूर्ण देशाला सुन्न करून सोडले होते. १३ ऑगस्ट २००४ रोजी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एक अत्यंत खडतर आणि संवेदनशील घटना घडली होती. अंदाजे २०० महिला, ज्या अनेक वर्षांपासून अकू यादव नावाच्या गुंडाच्या जाचाला कंटाळल्या होत्या त्यांनी त्याच्यावर कोर्टातच हल्ला करून त्याची हत्या केली होती. 

अकू यादव हा नागपूरमधील कस्तुरबा नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता, आणि त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार, हत्या, ब्लॅकमेलिंग, आणि धमक्या यासारख्या गुन्ह्यांचा आरोप होता. त्याच्यावर वर्षांनुवर्षे गुन्हे दाखल झाले होते, पण त्याला अनेक वेळा जामीन मिळत होता. ' पोलीस माझे काहीच बिघडवू शकत नाहीत' म्हणत तो महिलांना धमकवायचा त्यांच्यावर अत्याचार करायचा. 

शेवटी न्यायालयात त्याच्या जामीन सुनावणीवेळी, महिलांचा राग आणि निराशा टोकाला पोहचली. त्या महिलांनी मिरची पावडर, दगड, आणि सुरी यांसारखी साधने घेऊन न्यायालयात हजार झाल्या आणि त्याच्यावर हल्ला केला. काही महिलांनी अकू यादवचे जननेंद्रिय कापल्याचा देखील दावा केला जातो.  त्याच्या शरीरावर अंदाजे ७० पेक्षा जास्त वार केले गेले होते, आणि तो १५ मिनिटांतच मरण पावला होता. काही महिला म्हणतात की त्यांनी हा निर्णय कायद्याचा विचार न करता घेतला; कारण बर्‍याच वर्षांपासून न्याय व्यवस्था आणि पोलिसांकडून त्यांना सुरक्षा मिळत नव्हती. 

या हल्ल्यानंतर सर्वच महिलांनी आम्हाला अटक करा अशी मागणी केली होती पण त्यातील काहीच महिलांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन तपासात आणि सुनावणीतून अनेक आरोपींना दोष सिद्ध होऊ शकला नसल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले. तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या घटनेवर बोलतांना म्हणाले की हा प्रकार “ कायद्याच्या कार्यक्षमतेतील कमतरता ” आणि “न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा तुटवडा” यामुळे घडला होता. 

ही घटना केवळ एक क्रूर प्रतिशोध नव्हे, तर समाजातील महिलांची कायमची असुरक्षा आणि न्याय न मिळाल्याचा एक मोठा आवाज होती. परंतु, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की कायदा आपल्या हातात घेणे ही योग्य पद्धत नाही कारण यामुळे कायदेशीर ठराविकता, जबाबदारी आणि पायाभूत संविधानात्मक मूल्ये धोक्यात येतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : 200 Women Kill Accused in Court: Nagpur's Gruesome Justice

Web Summary : Nagpur witnessed shocking justice when 200 women killed Akku Yadav, accused of rape and murder, inside a courtroom after years of police inaction. The incident highlighted systemic failures and lack of faith in the justice system.
टॅग्स :nagpurनागपूरMalegaonमालेगांवNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रSexual abuseलैंगिक शोषण