शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात २० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST

अभय लांजेवार उमरेड : तालुक्यातील पिराया (आंबोली) येथील ३२ वर्षाचा उमेश झाडे, उमरेडची लक्ष्मी बरडे (२५), उमेश काळे (२६), ...

अभय लांजेवार

उमरेड : तालुक्यातील पिराया (आंबोली) येथील ३२ वर्षाचा उमेश झाडे, उमरेडची लक्ष्मी बरडे (२५), उमेश काळे (२६), विजय गोटेफोडे (३८), कृष्णा मरघडे (३५), शंकर कारगावकर (३३), मनीषा लहाने (२२), पौर्णिमा बागडे (३०) परमेश्वर चौधरी (३५) पाचगाव येथील सविता मुंडके (२७) आदी लांबलचक यादी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये मृत पावलेल्या रुग्णांची आहे. या रुग्णांचा हकनाक बळी गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे. उमरेडच्या नवीन कोविड सेंटरमध्ये पाच दिवसात ५६ रुग्ण भरती झालेत. त्यापैकी ११ (१९.५६ टक्के) कोरोनामुक्त तर तब्बल २० (३५.७१ टक्के) जणांना जगण्यामरण्याच्या संघर्षातून जीव गमवावा लागला.

ऑक्सिजन सुविधेसह डॉक्टर, परिचारिकांची चमू येथे कर्तव्यावर आहे. शिवाय व्हेंटिलेटरही देण्यात आले. असे असतानाही मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोविड सेंटरवर नियंत्रण कुणाचे आणि नेमकी चूक कुठे होत आहे, यावर आता खऱ्या अर्थाने चिंतन होणे गरजेचे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांचाही जीव जात असून उमरेडच्या कोविड सेंटरमधून दररोज चार-पाच जणांचे मृतदेह बाहेर पडत आहेत. तत्पूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे ही सुविधा २३ मार्चपासून सुरू होती. या कोविड सेंटरमध्ये केवळ एकमेव डॉक्टर व चार परिचारिकांच्या खांद्यावर ४० बेडचा भार होता. शिवाय ऑक्सिजनची सुविधा समाधानकारक नव्हती. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा जुन्या कोविड सेंटरमध्ये १०९ रुग्ण भरती झाल्यावर ८१ रुग्ण (७४.३१ टक्के) कोरोनामुक्त झाले. तसेच २८ (२५.६९ टक्के) जणांचा या कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला.

नवीन कोविड सेंटरच्या तुलनेत जुन्या ठिकाणी फारशा सुविधा नसतानाही योग्य नियंत्रण राखल्या गेले. दुसरीकडे नवीन ८० बेडच्या कोविड सेंटरमध्ये तीन डॉक्टर आणि १२ परिचारिकांची फळी कर्तव्यावर आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत केवळ २७ रुग्ण या ठिकाणी भरती होते. काही दिवसांपूर्वी २६ एप्रिलला एक अपंग तरुण बऱ्याच वेळेपर्यंत बेडलगतच पडून होता. या संपूर्ण परिस्थतीवरून कोविड सेंटरच्या सोयी-सुविधा आणि कार्यप्रणालीवर टीका केली जात आहे. तातडीने उणिवा दूर कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

आकडेवारीची लपवाछपवी

उमरेड तालुक्यात दररोज कोरोनामुळे मृत्यूचे चक्र सुरू आहे. असे असतानाही शासन दफ्तरी संपूर्ण मृत्यूची नोंद घेतली जात नसल्याची ओरड आहे. मृत्यूच्या आकडेवारीच्या लपवाछपवीचा प्रकार तर सुरू नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.

सेंटरवर जनरेटर नाही

उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये जनरेटरची सुविधा नाही. कालपरवाच विद्युत बंद झाली. विद्युत पुरवठा खंडित होताच एकच धावपळ उडाली. ८० बेडच्या या सेंटरमध्ये साधे जनरेटर उपलब्ध नसावे, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नसता तर कदाचित हे सेंटर उशिरानेच सुरु झाले असते. सर्वच सुविधा सामाजिक कार्यकर्ते करतील तर मग शासन-प्रशासनाचे काम काय, असाही सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.