दुचाकीवरून जाणाऱ्या वहिनी-नणंदेचा भर रस्त्यावर विनयभंग अन् हल्ला

By योगेश पांडे | Updated: October 3, 2023 15:15 IST2023-10-03T15:14:48+5:302023-10-03T15:15:03+5:30

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परत ऐरणीवर

2 women who was riding a bike, was molested and assaulted on the road | दुचाकीवरून जाणाऱ्या वहिनी-नणंदेचा भर रस्त्यावर विनयभंग अन् हल्ला

दुचाकीवरून जाणाऱ्या वहिनी-नणंदेचा भर रस्त्यावर विनयभंग अन् हल्ला

नागपूर : दुचाकीवरून जाणाऱ्या वहिनी व नणंदेला शिवीगाळ करत भर रस्त्यावर विनयभंग करण्यात आला व त्यानंतर डोक्यावर वीट मारत हल्ला करण्यात आला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून महिला सुरक्षेचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे .

दोन दिवसांअगोदर पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३८ वर्षीय महिला तिच्या नणंदेसह मोपेडने जात असताना आरोपी आदित्य उर्फ बिल्ली विकास बब्बर (२०, पाचपावली) हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह त्यांच्या गाडीसमोर आला. तो जागा देत नसल्याने महिलेने हॉर्न वाजवला. त्यावरून आदित्यने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शिवीगाळ का करतो असे म्हणत हटकले असता आरोपींनी दोन्ही महिलांचा भर रस्त्यात विनयभंग केला. त्यानंतर आदित्यने महिलेच्या डोक्यावर वीट मारत तिला जखमी केले.

या प्रकारामुळे घटनास्थळी लोक जमा झाले व आरोपी पळून गेले. पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली व जखमी महिलेला उपचारासाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. महिलेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपी आदित्यला अटक केली असून इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: 2 women who was riding a bike, was molested and assaulted on the road