शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१९०० क्विंटल तूर डाळ जप्त

By admin | Updated: April 24, 2016 10:31 IST

बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली.

डाळीच्या साठ्यांवर पुन्हा धाडी : जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई नागपूर : तूर डाळीचा साठा करून कृत्रिम भाववाढ निर्माण करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर शासन व प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत गोदामांवर धाडी टाकून तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला होता. महिनाभर ही कारवाई चालली. नंतर मात्र कारवाई थंड पडली. परंतु प्रशासनाने पुन्हा डाळींच्या साठ्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली असून शुक्रवारी टाकलेल्या धाडीत तब्बल १९०० क्विंटल तूर डाळीचा साठा जप्त करण्यात आला. बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली. कामठी तालुक्यातील मौजा लिहिगाव येथील लक्ष्मी वेअर हाऊसच्या गोदामामध्ये टाकलेल्या धाडीमध्ये १९०० क्विंटल तुरीचा साठा जप्त केला. कामठी तालुक्यातील मौजा लिहिगाव येथे लक्ष्मी वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीसाठीचे गोदाम असून त्या ठिकाणी कळमना येथील मे. योगेश इंडस्ट्रीजने १९०० क्विंटल तुरीचा साठा अनधिकृतपणे साठवून ठेवला होता. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला माहिती मिळाली असता त्यांनी धाड टाकली. जप्त करण्यात आलेल्या या डाळीच्या साठ्याची अंदाजे किंमत ८,७०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे १ कोटी ६५ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे, प्रज्ज्वल पाथरे यांनी केली. (प्रतिनिधी)