'एसबीएल'च्या ९ चुकांचे १९ बळी; एकाच जागी स्फोटकांचा साठा ठेवल्याने स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:34 IST2026-03-04T19:28:29+5:302026-03-04T19:34:36+5:30
Nagpur : 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या कंपनीत स्फोट का झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र, 'पेसो' (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनयाझेशन) व 'डिश'च्या (डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) प्राथमिक अहवालात कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे.

19 victims due to 9 mistakes of 'SBL'; Explosion due to storing explosives in one place
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'एसबीएल एनर्जी लिमिटेड' या कंपनीत स्फोट का झाला याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. मात्र, 'पेसो' (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनयाझेशन) व 'डिश'च्या (डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) प्राथमिक अहवालात कंपनीवर ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनीने 'नोनल क्रिम्पिंग' युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांना तातडीने दुसऱ्या इमारतीत न हलविता तेथेच साठा केला. परिणामी अपघात झाल्यानंतर संपूर्ण इमारतच पत्त्यांप्रमाणे उडली व बेचिराख झाली. सोबतच कंपनीकडून सरकारी नियमांना जागोजागी केराची टोपली दाखवत नऊ प्रकारच्या सुरक्षा नियमांचे थेट उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
'लोकमत'ला अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'पेसो' व 'डिश'च्या पथकाने स्फोट झाल्यानंतर संपूर्ण घटनास्थळाचे सर्वेक्षण सकाळी ६:३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंजना या ७० टक्के भाजल्या होत्या आणि स्फोटामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले होते. अतिरक्तस्त्राव आणि 'हायपोव्होल्युमिक शॉक' मुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे.
कामगारांच्या जिवावर उठलेले 'एसबीएल'
'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार 'पेसो' व 'डिश'च्या पथकाने त्यांच्या अहवालात कशा पद्धतीने 'एसबीएल'ने सरकारी नियमांची ऐशीतैशी केली हेच मांडले आहे. जर 'एसबीएल'च्या प्रशासनाने नियमांचे पालन केले असते तर लहानशी ठिणगी उडल्यानंतर इतका मोठा स्फोट झाला नसता.
'पेसो'-'डिश'च्या सूचनांना केराची टोपली
'पेसो' व 'डिश'च्या पथकाने २१ जून २०२४ रोजी 'एसबीएल'चा भेट देत तेथील सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली होती. त्यात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. पथकाने एसबीएल प्रशासनाला आवश्यक सुधारणा करण्याची सूचना केली होती. मात्र, एसबीएलने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. जर त्यावेळी पावले उचलली असती तर १९ कामगारांचे निश्चितपणे जीव वाचले असते.
कंपनीविरोधातील अहवालातील प्रमुख मुद्दे
- आग लागल्यानंतर नियंत्रण आणण्यासाठी फायर ट्रेलर पंपच कंपनीत ठेवण्यात आलेला नव्हता.
- नियमांनुसार दोन सुरक्षा अधिकारी तैनात करणे आवश्यक होते. मात्र, केवळ केदार पंचपुत्रेलाच तैनात करण्यात आले होते.
- कंपनीत आरोग्य अधिकारीच नेमण्यात आलेले नव्हते.
- 'डिश'च्या कार्यालयात कामगारांच्या सुट्टया व वेतनाचे तपशील सादर करण्यात आले नव्हते.
- फ्लेमप्रूफ सीसीटीव्ही कॅमेरे कंपनीत लावण्यात आले नव्हते.
- अंतर्गत सुरक्षा ऑडिट 'डिश' कार्यालयाला सादरच करण्यात आले नव्हते.
- ८०९ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १८३ जणांसाठीच फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
- 'डिश'च्या कार्यालयाकडे कामगारांच्या प्रशिक्षणाचे कुठलेही तपशील सादर करण्यात आले नव्हते.