शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

१८९ प्रवासी रात्रभर विमानातच

By admin | Updated: April 19, 2016 06:22 IST

मुंबई येथून कोलकाताकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी

नागपूर : मुंबई येथून कोलकाताकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी लागली. विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे विमान नागपूर विमानतळावर रविवारी रात्री १०.३० वाजता आकस्मिक उतरवावे लागले होते. प्रवाशाला उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. नियमानुसार विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर उड्डाण भरण्यासाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून तांत्रिक तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ही बाब देशांतर्गत व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. पण स्पाईसजेट कंपनीची विमान सेवा नागपुरात नसल्यामुळे कंपनीचे अभियंते नागपुरात उपलब्ध नव्हते. अभियंते दुसऱ्या विमानाने नागपुरात येईपर्यंत पहाट झाली. त्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच सकाळी ५.३० च्या सुमारास विमानाने मुंबईकडे उड्डाण भरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ संचालक अवधेश प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना दिली. स्पाईसजेटच्या विमानात १८९ प्रवासी होते. रविवारी रात्री १०.३० ते सोमवार सकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्थात तब्बल ७ तास प्रवासी विमानात बसून होते. एअर इंडिया, इंडिगो, गो एअर आदी कंपन्यांची नागपूर विमानतळावर सेवा आहे. या कंपन्यांचे अभियंते नागपुरात आहेत. पण त्या कंपन्यांच्या अभियंत्यांची सेवा न घेता स्पाईसजेटच्या अभियंत्यांसाठी रात्रभर थांबावे लागले. तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)