ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 14:31 IST2022-01-04T14:16:39+5:302022-01-04T14:31:06+5:30

सावनेर येथे दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

17 year old student killed after being crushed under a truck, incident captured on CCTV | ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार; घटना सीसीटीव्हीत कैद

नागपूर : रात्री साडेदहीची वेळ एक दुचाकी वेगाने आली आणि  ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून ट्रकखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात सावनेर रोडवर झाला असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

वाहन चालवताना गती आणि नियंत्रण दोन्ही महत्वाचं या दोन्हीकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. ३ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आणि त्यात १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नवीनवर्षाच्या सुरुवातीलाच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अथर्व काळे (१७) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीचा अपघात होऊन अथर्व खाली पडला आणि यातच शेजारुन जाणारा ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सोबतच जड वाहन शहरातून प्रवेश करत असतांना त्यांच्या वेगमर्यादेवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे देखील या अपघाताचा निमित्ताने उघड झाले आहे.

Web Title: 17 year old student killed after being crushed under a truck, incident captured on CCTV