१७ लाखांची अफरातफर, चौकशी समितीत स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:58+5:302020-12-02T04:12:58+5:30

नागपूर : मेडिकल सोडून गेलेल्या कंत्राटी डॉक्टरांचे १७ लाख रुपये एका लिपीकाने आपल्या खात्यात वळते केल्याचे मंगळवरी चौकशी अहवालात ...

17 lakh scam, clear in inquiry committee | १७ लाखांची अफरातफर, चौकशी समितीत स्पष्ट

१७ लाखांची अफरातफर, चौकशी समितीत स्पष्ट

Next

नागपूर : मेडिकल सोडून गेलेल्या कंत्राटी डॉक्टरांचे १७ लाख रुपये एका लिपीकाने आपल्या खात्यात वळते केल्याचे मंगळवरी चौकशी अहवालात स्पष्ट झाले. मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडे संबंधित लिपीकावर जबर कारवाईची मागणी केली आहे. परंतु हे प्रकरण २०१५ पासूनचे असल्याने इतरांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. यामुळे विभागीय चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

मेडिकलमध्ये कंत्राटी डॉक्टरांच्या २६ वर जागा आहेत. यातील काहींना सहा महिन्यांचे तर काहींना अकरा महिन्यांचे कंत्राट दिले जाते. रुग्णालयीन व्यवस्थापनेमध्ये या डॉक्टरांची मदत होते. परंतु हे डॉक्टर कधी सोडून जातील याचा नेम राहत नाही. याचाच फायदा घेत एका लिपीकाने रुग्णालय सोडून गेलेल्या डॉक्टरांना कामावर रुजू दाखवित त्यांच्या वेतनाचे पैसे आपल्या खात्यात वळते केले. ही बाब मेडिकलचे खाते दुसऱ्या एका बँकेत स्थानांतरित करीत असताना बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती मेडिकल प्रशासनाला दिली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. मंगळवारी तीन सदस्यीय समितीने चौकशीचा अहवाल अधिष्ठात्यांकडे सोपविला. अहवाल गोपनीय असल्याने या प्रकरणात आणखी कोण गुंतलेले आहे, हे समोर आले नाही. मेडिकल प्रशासनाने हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांच्याकडे पाठविला आहे. सोबतच संबंधित लिपीकावर जबर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता या प्रकरणात कुणावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-इतरांचीही चौकशी होणे आवश्यक

अस्थायी डॉक्टरांच्या वेतनाच्या अफरातफर होण्याचे हे प्रकरण २०१५ पासूनचे आहे. यामुळे हे काम कुणा एका कर्मचाऱ्याचे नाही. यात मोठे मासे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डीएमईआर’ने याची विभागीय चौकशी केल्यास नेमके प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: 17 lakh scam, clear in inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.