नागपूर विमानतळावर ८० लाखांचे सोने जप्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 10, 2023 16:16 IST2023-01-10T16:06:49+5:302023-01-10T16:16:07+5:30

कस्टम विभागाची मोठी कारवाई

1400 grams of gold worth 80 lakhs seized at Nagpur airport | नागपूर विमानतळावर ८० लाखांचे सोने जप्त

नागपूर विमानतळावर ८० लाखांचे सोने जप्त

नागपूर : गो एअर कंपनीच्या जी८-२६०१ विमानाने मुंबईहून नागपूरला येणाऱ्या एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाऱ्यांनी १,४०० ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत ८० लाख रुपये असल्याची माहिती आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशाला पुढील चौकशीसाठी कार्यालयात नेले आहे.

अहमद मुर्तुझ असे प्रवाशाचे नाव असून तो देशांतर्गत विमानाने प्रवास करीत होता. मंगळवार, १० रोजी सकाळी ८.२० वाजता प्रवासी नागपूर विमानतळावर उतरताच प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्याकडून १ किलो ४०० वजनाची सुवर्ण भूकटी जप्त केली. प्रवाशाला सकाळी १०.३५ वाजता चौकशीसाठी कार्यालयात नेले.

Web Title: 1400 grams of gold worth 80 lakhs seized at Nagpur airport