शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टअखेर होणार १०२ वा दीक्षांत समारंभ

By admin | Updated: July 1, 2015 03:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त अखेर निघाला आहे.

व्यवस्थापन परिषदेत निर्णय : विद्यार्थ्यांना लगेच मिळणार पदव्यानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. आॅगस्ट अखेरीस दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. या दीक्षांत समारंभापासूनच विद्यार्थ्यांना तत्काळ पदव्या मिळणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक राहणार आहे.३१ आॅगस्टला विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांची मुदत संपणार आहे. त्याअगोदर १०२ वा दीक्षांत समारंभ घेण्यात यावा, हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. त्याला सर्वांनी एकमताने मान्यता दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मंजुरीनंतर निश्चित तारीख ठरविण्यात येईल. परंतु आॅगस्टच्या अखेरच्या आठवड्यात हा दीक्षांत समारंभ पार पडेल, असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले. पदवीसाठी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. परंतु यंदापासून ही प्रणाली बदलण्यात येईल. समारंभाच्या अगोदरच सर्वांच्या पदव्या तयार राहतील व समारंभ झाल्यावर तातडीने त्या महाविद्यालयांकडे पाठविण्यात येतील, असे ते म्हणाले.‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरीदरम्यान, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठात ‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यास सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. ‘एबीबी’ कंपनीनेदेखील विद्यापीठाला सामंजस्य कराराचा मसुदा पाठविला असून येत्या काही दिवसांत विद्यापीठ व ‘एबीबी’तर्फे संयुक्त मसुदा तयार करण्यात येईल. यंदापासूनच ‘रोबोटिक्स टेक्नॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदविका सुरू करण्यात येईल. ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ व इतर अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून सुरू होतील.