शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:12 IST

100% attendance of employees in government offices जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत कोरोनाचे संक्रमण प्रचंड वाढले होते. जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता सरकारने ५०, १५ आणि ५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली होती. जिल्हा परिषद, कोषागार कार्यालयांनी वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊनसुद्धा लावले होते. सोबतच अभ्यागतांचे प्रवेश बंद करण्यात आले होते. सिव्हिल लाईन परिसरातील दिवसभर सुरू असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ मंदावली होती; पण कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत गेले आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती वाढत गेली. आता कार्यालयांमध्ये अभ्यागतांचीही उपस्थिती वाढली आहे. कर्मचारी अधिकारी पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. मंगळवारी सिव्हिल लाईन परिसरात कार्यालय सुरू झाल्याने चांगलीच वर्दळ दिसून आली. वाहनांची संख्या परिसरात वाढलेली होती. सरकारी कार्यालयांत १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. सरकारी कार्यालये पुन्हा गजबजलेली दिसून आली.

 महिला कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

काही महिला कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाचा प्रभाव संपला नसल्याने घरातील लहान मुले व वडीलधाऱ्या माणसांबद्दल चिंता व्यक्त करून शासकीय कर्मचाऱ्यांची ३० जूनपर्यंत उपस्थिती ५० टक्के ठेवण्याची भावना व्यक्त केली.

 कर्मचारी संघटनांनी दाखविली सकारात्मकता

कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जुनी प्रलंबित कामे निकाली काढणे, जनतेची कामे, खरीप हंगाम, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, विकासकामांचे नियोजन व अर्थचक्र सुरू राहण्यासाठी कार्यालयांमद्ये कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे.

डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार