CoronaVirus: शेअर बाजार पडतोय... मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक थांबवायची का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:39 PM2020-03-16T12:39:13+5:302020-03-16T12:41:05+5:30

Mutual Funds: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस सोन्याचा.

Corona Virus: share market is falling; should i stop to invest in mutual funds? | CoronaVirus: शेअर बाजार पडतोय... मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक थांबवायची का?

CoronaVirus: शेअर बाजार पडतोय... मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक थांबवायची का?

Next
ठळक मुद्देशेअर बाजार पडणं हे जितकं सहज तितकंच तो सावरणं हेसुद्धा सोप्पं! म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस सोन्याचा.पडत्या मार्केटमध्ये आणि चढत्या मार्केटमध्ये खरेदी करणं यातच खरं कौशल्य आहे.

मित्रहो गुंतवणूक किती काळासाठी करताय? शॉर्ट टर्मसाठी करताय? का लॉन्ग टर्म साठी?

जर तुम्हाला 'लंबी रेस का घोडा' हे तत्त्व मान्य असेल तर बाजारात येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडथळ्यांची पर्वा करायचं काहीच कारण नाही. शेअर बाजार पडणं हे जितकं सहज तितकंच तो सावरणं हेसुद्धा सोप्पं! या सगळ्याचा अभ्यास म्युच्युअल फंडातील तज्ज्ञ फंड मॅनेजर करतच असतात. मग आपण पॅनिक कशाला व्हायचं? आपण आपली गुंतवणूक सुरू ठेवायची. शेअर बाजार का कोसळला? त्यामागची काय कारणं असतील? मग त्यावर आपल्याकडे काय उपाय आहे? या सगळ्या कठीण प्रश्नांची सोपी उत्तरे म्हणजेच म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस सोन्याचा. म्युच्युअल फंडात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताय? मग शेअर बाजार पडतोय का वर जातोय हा प्रश्न नसून तुम्ही पडत्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करता का?  हा प्रश्न आहे.

शेअर बाजार की म्युच्युअल फंड?... कुठे मिळेल हमखास नफा?

कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

सुप्रसिद्ध गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांचं एक गाजलेले विधान आहे. पडत्या मार्केटमध्ये आणि चढत्या मार्केटमध्ये खरेदी करणं यातच खरं कौशल्य आहे. तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर शेअर बाजार वर जातो का खाली याची भीती बाळगायचं काहीच कारण नाही.

एक सोपे उदाहरण घेऊया समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा एक हजार रुपयाची एसआयपी केली आहे आणि म्युच्युअल फंडाचा दर 15 रुपये आहे म्हणजेच NAV 15 रुपये आहे तर त्याला एका महिन्यात सहासष्ट युनिट मिळतील समजा पुढच्या महिन्यात शेअर बाजार कोसळला आणि NAV 12 रुपये झाली तर त्याला त्या महिन्यात 84 युनिट मिळतील म्हणजेच NAV कमी तेवढे  युनिट जास्त आणि आणि NAV जसजशी वाढत जाईल तसे त्याचे मार्केट रिटर्न सुद्धा वाढत जातील.

म्युच्युअल फंडात पैसे कुणी गुंतवावेत?

म्युच्युअल फंडात किती रक्कम गुंतवू?

त्यामुळे बढत्या मार्केटमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड सही है आणि पडत्या मार्केटमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड सही है.

पुढे दिलेल्या टेबल पहा..... मार्केट पडतंय आणि मार्केट वाढतंय या दोन्ही वेळेला फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला त्याचा लॉंग टर्ममध्ये फायदाच होत आलेला आहे.

Web Title: Corona Virus: share market is falling; should i stop to invest in mutual funds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.