शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लग्न केलं तेच चुकलं, असं कुणाला वाटतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:18 IST

Relationship News: प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते,

- चंद्रकांत कित्तुरे(वृत्तसंपादक, कोल्हापूर)

'तुझ्याशी लग्न केलं तेच चुकलं, पश्चात्ताप होतोय आता याचा. अनेकजण सांगत होते करू नको, पण म्हटलं नाही हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार, आवडला होतास तू मला. तुझं वागणं, बोलणं, राहणं, दिसणं सगळं कसं सतत हवहवसं वाटायचं, पण लग्नानंतर तुझे खरे रूप दिसू लागलं. अन् हाच का मला आवडलेला तू? असा प्रश्न पडू लागला. पण, नाही आता हे असह्य झालंय, आपण वेगळं झालेलंच बरं', अशा शब्दांत बायको नवऱ्याला सुनावत होती अन् नवरोबा चुपचाप ऐकत होते. या दोघांचा प्रेमविवाह होता अन् लग्नाचे नऊ दिवस संपताच त्यांच्यात खटके उडू लागले होते.

हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे जपानमध्ये नुकताच झालेला एक सर्व्हे. प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते, कारण १० पैकी सात महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हत्या. नवऱ्याची कमाई, त्याच्या सवयी, दोघेही नोकरी करत असल्याने नवऱ्यानेही संसारात समानच नाही तर काहीवेळा जास्तीचा हातभार लावावा, असे वाटणे, किरकोळ गोष्टींवरून चीडचीड, संशय घेणे, लग्नाआधी सुखी संसाराची जी स्वप्ने पाहिली होती, ती प्रत्यक्षात न येणे, अशी अनेक कारणे यामागे होती.

कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती१२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमधील ९३ टक्के लोकसंख्या शहरी आहे. शिवाय केवळ २८७ महिलांच्या सर्व्हेवरून संपूर्ण देशातील विवाहित महिलांबाबत असाच निष्कर्ष काढणे कदाचित चुकीचे ठरेल. पण औद्योगिकदृष्ट्या प्रगत जपानमधील महिलांचे भावविश्व उदासीनतेकडे तरी चाललेले नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. हा प्रश्न कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे, हे निश्चित.

भारतात असा सर्व्हे होईल?१. एकदा लग्न झाले की, तोच आयुष्याचा जोडीदार. तो कसाही असला तरी त्याच्याशी जमवून घेत आयुष्य काढायचे, अशा विचारांचा पगडा असलेल्या भारत देशातील विवाहित महिला त्यांच्या संसारात सुखी आहेत का?, असा विचारही कधी कुणी केला नसेल. त्यामुळे जपानसारखा सर्व्हे अद्याप तरी भारतात झालेला नाही.

२. भारतातील ६५ ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारतीय समाजात पतीला परमेश्वर मानले जाते. पती, सासरच्या मंडळींकडून सुख मिळो न मिळो एकदा लग्न झाले की, त्याच पुरुषाशी संसार करण्यात इतिकर्तव्यता, असे महिला समजतात. त्यामुळे लग्न करून पश्चावले, अशी मानसिकता किमान अरेंज मॅरेजमध्ये तरी नसते. झाली तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्या सहन करत असतात.

३. शहरी भारतात लिव्ह इनचे, प्रेमविवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. करिअर, आवडी-निवडीला प्राधान्य दिले जाते. पतीने घरकामात बरोबरीने मदत करावी असे नोकरी, व्यवसाय करणाऱ्या तरुणींना वाटते. त्यांना त्यांची स्पेस जे तरुण देतात, त्यांचा संसार सुखी होत आहे.

लग्न करायचे, पण स्वतंत्र राहायचा वाढतोय ट्रेंडलग्न करूनही एकत्र न राहता स्वतंत्र राहण्याचा ट्रेंड जपानमध्ये वाढत आहे. बंधने कमीत कमी म्हणजेच मी कसं जगायचं, कसं राहायचं, याचं स्वातंत्र्य मला असले पाहिजे, अशी भावना जपानमधील युवा पिढीत वाढत आहे. त्यातून 'विवाहित, पण विभक्त' ही संकल्पना तिथे लोकप्रिय होत आहे. कायदेशीररीत्या विवाहित असल्याने भावनिक जवळीकता जपता येते, त्याचबरोबर स्वातंत्र्यही अबाधित राहते. करिअर, आवडी-निवडी, छंद जोपासत जीवनसाथीला प्रेम आणि पाठबळ देऊ करणारी, अशी ही व्यवस्था आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Regretting Marriage: Survey reveals unhappiness among Japanese married women.

Web Summary : Japanese survey shows 70% of married women regret their marriage, citing reasons like husband's habits, unequal contribution to household chores, and unmet expectations. This raises concerns about family systems, contrasting with traditional Indian views on marriage. Trends like living separately after marriage are rising in Japan.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न