शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकटेपणाला कंटाळून जोडीदार शोधताय? 'ही' खबरदारी नक्की घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:48 IST

Marriage: साठी-सत्तरीत दुसऱ्या लग्नाची वाट हवीहवीशी वाटणाऱ्या काही कहाण्या 'सुफळ संपूर्ण' होतात हे गेल्या रविवारच्या (दि. १९ जानेवारी) लेखात वाचलंच; पण म्हणजे ही वाट वरवर दिसते आणि वाटते तेवढी सरळ असते का?- तर अजिबात नाही...

- भक्ती बिसुरेपासष्टीचे सुमंत काका. मुलं परदेशात असतात. पत्नी गेली त्याला आता बरीच वर्षे झाली. आता या वयात एकटं घर खायला उठतं म्हणून त्यांना जोडीदार हवा आहे; पण अशी जोडीदार शोधणं काही साधी गोष्ट नाही. ज्येष्ठांसाठीच्या मॅचमेकिंग क्लबचा सध्या सर्वत्र सुळसुळाट आहे. एका क्लबमध्ये काका दुसऱ्या लग्नासाठी नाव नोंदवायला गेले. नाव नोंदवण्यासाठी पैसे भरले. मग विवाहइच्छुक महिलांच्या फोटोंच्या अल्बमची चलतचित्रं त्यांच्यापुढे ठेवण्यात आली. 'फोटो पाहा. त्यातून पाच प्रोफाइल्स निवडा. त्या पाच जणींना प्रत्यक्ष भेटण्यासाठी अमुक एवढे हजार भरा...' तेवढे हजार भरून काही दिवसांनी काका फॉलोअप घ्यायला गेले तेव्हा 'त्या' पाचही जणींनी तुम्हाला 'रिजेक्ट' केलंय, आता नवीन पाच प्रोफाइल्स निवडण्यासाठी पुन्हा अमुक एवढे हजार भरा...' असं सांगण्यात आलं. आणि काकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

सुमंत काकांना शंका आली, त्यामुळे ते फार पुढे गेले नाहीत आणि मोठी फसवणूक टळली; पण सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबात हे नसतं. आर्थिक फटका तर बसतोच, शिवाय मानसिक ताण वाट्याला येतो, तो वेगळाच!

ज्येष्ठ नागरिक, खासकरून पुरुष नव्याने जोडीदाराच्या शोधात असताना लाखो रुपयांना फसवले जातात. अशी अनेक उदाहरणं सध्या आजूबाजूला दिसतात. सोशल मीडियाने तर असं फसवणं आणि फसवणं खूपच सोपं करून ठेवलंय. सायबर स्कॅम्समध्ये होणारी फसवणूक असेल की, हनिट्रॅपसारख्या गोष्टींमध्ये अडकवून लुबाडणं, ज्येष्ठ नागरिक सध्या सॉफ्ट टार्गेट आहेत. दुसऱ्या जोडीदाराचा विचार करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातल्या ज्येष्ठांपैकी बहुतेकांकडे बऱ्यापैकी पैसा आणि प्रॉपर्टीही आहे. म्हणूनच जोडीदार शोधण्याची वाट एकट्याने चोखाळणं काही शहाणपणाचं नाही.

पुण्यातल्या 'ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप' मंडळाचे संस्थापक माधव दामले सांगतात, 'आमच्याकडे येणारे काही सधन ज्येष्ठ पूर्वी लाखभर रुपयांना फसून आलेले आहेत. 'सेकंड इनिंग'साठी जोडीदाराचा शोध घेणं आणि त्यातील संभाव्य फसवणूक टाळणं हे कर्मकठीण आहे. त्यामुळे विश्वासू मध्यस्थ असेल तरच हा मार्ग पत्करावा असा सल्ला मी देतो. आमच्याकडे नाव नोंदणीसाठी येणाऱ्या ज्येष्ठांबाबत आम्ही अनेक प्रकारची 'व्हेरिफिकेशन्स' करतो, त्यात पोलिस व्हेरिफिकेशनचा समावेश आहेच; पण घटस्फोट असेल तर त्याची कागदपत्रं तपासणे, वैद्यकीय माहिती, माहिती असलेले-नसलेले आजार, आर्थिक व्यवहार, वारसा हक्कविषयक तरतुदी, दुसरं लग्न किंवा लिव्ह इन टिकलं नाही तर पुरुष आपल्या जोडीदार महिलेच्या भविष्यासाठी काय तरतूद करायला तयार आहेत, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहतो. एकूणातच काय, तर साठी-सत्तरीत पुनर्विवाहाचा निर्णय घेणं हे सोपं वाटत असलं, तरी तो निर्णय निभावणं अजिबातच सोपं नसतं. 'हे एकट्या माणसाचं काम नाही. एकट्याने ही वाट चोखाळायचं ठरवलं तर मात्र अपेक्षाभंग आणि फसवणूकच होण्याची शक्यता अधिक' असा इशारा माधव दामले देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Seeking companionship in old age? Take these precautions seriously.

Web Summary : Elderly individuals seeking partners are vulnerable to scams via matchmaking services and online platforms. Experts advise thorough verification and caution against navigating this process alone, emphasizing the importance of trusted intermediaries to avoid financial and emotional distress.
टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिप