शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म; सैनिकाची देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 06:00 IST

भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरव्ही माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे.

संकलन-बाबा मोहोडप्रिय मित्र-तुझे पत्र मित्र मिळाले. तू सैनिक होऊन लढाईवर गेलास हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला आहे. तुझ्यामागे भारताची कोट्यवधी जनता उभी आहे. तुझ्या यशाचे चिंतन ती करीत आहे. तुझ्या वीरवृत्तीचा त्यांना गर्व आहे. भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरव्ही माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे. मनुष्याला आपल्या समाजाकरिता जगायचे आहे व समाजाच्या हितासाठीच मरायचे आहे आणि हेच त्याच्या जीवनाचे सार्थक आहे असे मी मानतो. आमचा धर्म आजवर हीच शिकवण देत आला आहे. आमचा बराच काळ गुलामगिरीत गेल्याने त्याला विकृत स्वरूप आले आहे. पण ही विकृती व शिथिलता आता नष्ट झाली आहे. तुझ्यासारखे कोट्यवधी तरुण जागृत झाले आहेत.‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यरात्रिबोधन’ ही उपनिषदाची हाक भारताने सार्थ केली आहे. वास्तविक तरुणाचा हाच बाणा आहे व असावयास पाहिजे. अर्जुनाला वीर असूनही भ्रम झालेला होता व त्याचे भगवान श्रीकृष्णाने निरसन करून त्याला पुन्हा आपल्या कर्तव्याकडे वळविले. याला मी धर्मस्थापना समजतो. धर्मस्थापना म्हणजे मंदिर स्थापना नव्हे! तर धर्मवीर करण्याची परंपरा निर्माण करणे होय.मित्रा, तू निर्भय वृत्तीने व बाणेदारपणाने आपले कर्तव्य करीत राहा. देशाच्या स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे व मानवतेच्या संस्कृतीचे संरक्षण करणे हा खरा धर्म आहे व तो धोक्यात असल्यास, आक्रमण झाल्यास अन्यायाचा प्र्रतिकार हीच सैनिकाची खरी भक्ती आहे हे विसरू नकोस आणि या आपल्या ऐतिहासिक व वीर परंपरेला सोडू नकोस व आपले कर्तव्यकर्म करीत असताना जर प्रसंगी मृत्यूही आला तरी तुला त्याने मोक्षच मिळेल. वीरगती प्राप्त होईल. यात कसलाही संशय धरू नकोस. तुझ्या यशाने भारत सदैव विजयी राहो. हीच माझी तुला शुभकामना आहे.-तुकड्यादास

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज