शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कामात रमलेले संजयमामा

By admin | Updated: November 8, 2014 18:41 IST

अगदी हटयोग करूनही गर्व दूर न होऊ शकलेले अनेक जण असतात. काही जण मात्र काहीच न करताही योगाचे मूळ जाणल्यासारखे जगतात. अशी माणसे साधीसुधी असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून कायम शांती, समाधान व्यक्त होत असतं. अशाच एका मातीतल्या माणसाची ही गोष्ट.

 डॉ. संप्रसाद विनोद

 
 
काही माणसं मुळातच खूप वेगळी असतात. त्यांचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं, काम करणं सगळंच वेगळं असतं. त्यामुळेच ते सहज उठूनही दिसतं. शिवाय, आपण सगळ्यात उठून दिसावं, असा त्यांचा हेतू नसेल, तर त्यांच्या वेगळेपणाचा अधिक चांगला प्रभाव पडतो. संजयमामा हे अशाच काही विरळ्या लोकांपैकी एक आहेत. सदैव हसतमुख, तरतरीत दिसणार्‍या मामांचं शिक्षण फक्त १0 वीपर्यंत झालंय. पण, कुठलीही नवीन गोष्ट चटकन शिकून घेण्याची आणि आत्मसात करण्याची त्यांची क्षमता पाहिली, की असं वाटतं की लहान वयात त्यांना शिक्षणाची संधी मिळाली असती, तर नक्कीच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन मिळालेल्या संधीचं चीज केलं असतं!!
साडेपाच फुटांच्या आतबाहेर उंची असलेल्या मामांचं शरीर कष्टाने काटक, कणखर झालेलं आहे. मूळ कोकणातलं असल्यामुळं कष्टाळूपणा, परखडपणा, सरळपणा, मानीपणा, मनस्वीपणा, प्रामाणिकपणा, विश्‍वासार्हता तर त्यांच्या रक्तातच आहे. त्यांच्यासारखे मोलमजुरी करून पोट भरणारे कोकणातले असंख्य लोक आज पुण्यामुंबईत अनेक वर्षे वास्तव्याला आहेत. मुंबईतला ‘रामा गडी’ हा तर या सगळ्या गुणांचं प्रतीक बनलेला आहे. मामांचं वैशिष्ट्य असं, की त्यांचा परखडपणा, मानीपणा अस्सल कोकणी असला, तरी तो कधी अंगावर येणारा नसतो. त्यात आक्रमकता कमी आणि समजूतदारपणा अधिक असतो. हीच मला त्यांची खासियत वाटते. 
मामा आमच्याकडे कामाला आले ते त्यांच्या सासूबाईंच्या शिफारशीवरून. सासूबाई आधीपासून शांतिमंदिरमध्ये कामाला होत्या. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. मामा रत्नागिरीतल्या एका छोट्याशा खेड्यातून प्रथमच पुण्याला आलेले असल्याने सुरुवातीला थोडे गांगरले. गडबडले. ते स्वाभाविकही होतं. पण, माझी पत्नी ऋजुता आणि मला त्यांची साफ नजर आणि नजरेतला  प्रामाणिक भाव खूप आवडला. दुसर्‍या दिवसापासून ते कामाला येऊ लागले. काम ठरलं, बागकाम आणि इतर घरगुती कामात मदत करणं.  ऋजुताला बागेची फार हौस. बागकाम आणि झाडांबाबत असणारी जाणही खूप चांगली. हा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळालाय. तिच्या वडिलांनी तर लोकमान्यनगरमधल्या त्यांच्या छोट्याशा जागेत अनेक प्रकारची झाडं लावली आणि फुलवली होती. त्यातली काही निवडक फुलझाडं त्यांनी मोठय़ा प्रेमानं आपल्या लाडक्या लेकीकडं पाठवली.
ऋजुताने दिलेल्या सगळ्या सूचना नीट समजून घेत मामांचं काम सुरू झालं. आता इतकी वर्षं बागकाम केल्यामुळे ते या बाबतीत चांगलेच पारंगत झालेत. मामांना बागेत काम करताना पाहणंदेखील आनंददयी असतं. वेळेवर येऊन मनापासून, उत्साहाने, आपुलकीनं काम करणं, कामात कधी घाईगडबड-धसक फसक नसणं, सगळं लक्ष पूर्णपणे कामावर केंद्रित असणं, कुठलीही अनावश्यक बडबड न करता एकमार्गी, नेमून दिलेली सगळी कामं त्यांच्या वेळात  निगुतीने करणं आणि वेळ झाली, की तितक्याच शांतपणे निघून जाणं, कधीमधी थांबावं लागलं तर विनातक्रार थांबणं, हे सगळं त्यांच्या कामातून नेहमीच स्पष्टपणे जाणवतं. आमचा दीड वर्षाचा कुकू नावाचा पग जातीचा कुत्रादेखील रविवारी त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. मामा आले, की त्यांच्या अंगावर प्रेमाने उड्या मारतो. त्यांचं तोंड चाटतो. मामा मोठय़ा आनंदाने त्याला हे सगळं करू देतात. ठराविक दिवशी कुकूला प्रेमाने अंघोळ घालतात. त्यांना त्याची कधी घाण वाटत नाही. मामांमधले हे सगळे गुण पाहिले की मला प्रश्न पडतो, की कुठल्याही प्रकारची योगसाधना न करता या माणसात हे सगळे गुण आले तरी कुठून?
मामा व्रत-वैकल्यं, उपास-तापास, जपजाप्य, पारायण, नवस-सायास वगैरेमध्येही ते फारसे नसतात. चांगल्या संस्कारांची शिदोरी त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाली, हे तर उघड आहे. पण, त्यांचे आईवडीलदेखील फारसे काही शिकलेले नव्हते. तरीही त्यांनी मामांवर इतके छान संस्कार केले, हे विशेष. याउलट, खूप शिकलेल्या आईवडिलांची अत्यंत असंस्कृत मुलंही माझ्या पाहण्यात आहेत. म्हणजे, अभ्यासाचा, शिक्षणाचा आणि संस्कारांचा फारसा काही संबंध नसतो की काय? वर्षानुवर्षे हठयोगसाधना करणारे अनेक साधक माझ्या पाहण्यात आहेत. पण, मामांच्या वागण्या-बोलण्यातून सहजपणे प्रकट होणार्‍या गुणांचा त्यांच्यात मागमूसही दिसत नाही. हठयोगामुळे त्यांचं बाह्य शरीर निरोगी झालंय खरं, पण अंतरंग मात्र तसंच राहिलंय. खूप काळ उपासना करणार्‍यामध्येदेखील  वैचारिक बंदिस्तपणा, कर्मठपणा, विशिष्ट पद्धतीने उपासना करण्याचा दुराग्रह,  त्यातून निर्माण होणारा अभिमान, अहंकार दिसून येतो. मग हे सगळे उपासना प्रकार निरुपयोगी म्हणायचे का? नक्कीच नाही. पण,  कुठलीही उपासना करताना ती ‘जीवनस्पश्री’ होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. जीवनस्पश्री म्हणजे जीवनातील प्रश्न सोडविण्यास आवश्यक असणारे गुण निर्माण करण्यास ती सर्मथ असणं. साधनेच्या, उपासनेच्या साह्याने आपलं अंतरंग, आपला दृष्टिकोन बदलणं. म्हणजे, मामांसारख्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सहज प्रकट होणारं समाधान, शांती, प्रसन्नता आपल्या जीवनात येणं. साधनेच्या, उपासनेच्या ‘तपशिला’बरोबर त्यामागील ‘तत्त्व’ समजणं.  शब्दांबरोबरच त्या शब्दांमागील ‘भाव’ समजणं. ‘लेटर्स’ मागील ‘स्पिरिट’ जाणणं. हे जमलं तर मामांसारख्या साध्यासुध्या माणसाच्या कुशल ‘कर्मातून’ प्रकट होणारा ‘योग’ समजून घेणं कठीण जाणार नाही !! 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)