शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सज्ज; पण काळजी घ्या - राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:05 IST

कोरोना व्हायरस आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रय} करीत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून आजच अनेक गोष्टींची तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांच्या सहकार्याचीही अपेक्षा आहे. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

- राजेश टोपे (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र)

* कोरोना व्हायरसच्या संदर्भात सध्याची परिस्थिती कशी आहे?
- परिस्थिती नियंत्रणात आहे, संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करून ठेवली आहे; पण नागरिकांकडूनही सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडणे थांबवले नाही तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल. जगातील काही देशांत अचानक रुग्णांची संख्या वाढली. इतक्या रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले. आपल्याकडे तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.  
* कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी सरकारने काय काय केले?
- आमच्यासमोर चित्र स्पष्ट होत होते. जनतेत जागरुकता निर्माण करणे गरजेचे होते. ‘इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन’ या सूत्रावर भर देणे आवश्यक होते. आमच्याकडे 2019-20 चे बजेट अखर्चित होते. ते आमच्या मदतीला आले. त्यामुळे राज्यभर होर्डिंग्ज लावले गेले, शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अधिकार्‍यांच्या सतत बैठका सुरू होत्या. ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या खरेदी करण्याचे आदेश दिले. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती बंधनकारक केले गेले. जिल्ह्या-जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार केले गेले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्याचे पुढे काय करायचे, संशयित असेल तर त्याचा फॉलोअप कसा करायचा याची यंत्रणा कामाला लावली गेली. 
* पण आपल्याकडे एवढे रुग्ण अचानक कुठून वाढले?
- ज्या सात देशांची यादी आपल्याला केंद्राने दिली होती, त्या ठिकाणांहून येणारे पेशंट तपासले जात होते. मात्र दुबईहून अचानक 40 लोकांचा एक ग्रुप आला. आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 50च्या आसपास आहे, त्यातील 20 रुग्ण एकट्या दुबईतून आलेले होते. त्यांच्यामुळे बाधित झालेले 5 ते 8 रुग्ण निघाले. 
* कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आपण जाऊ अशी भीती कशामुळे वाटते?
- मी स्वत:, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ जनतेला हात जोडून विनंती करत आहोत की त्यांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये; पण लोकांनी ऐकले नाही तर नाईलाजाने सगळे बंद करावे लागेल. या काळात हा आजार तिसर्‍या टप्प्यात गेला तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे सगळ्यांनी जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. 
* रुग्ण तपसणीसाठी लॅबचा तुटवडा आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करता येईल?
- या लॅब भारत सरकारच्या नियमानुसार उभ्या करायच्या असतात. आम्ही आणखी आठ लॅब सुरू करत आहोत. मात्र त्यासोबतच काही खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्याची शिफारस केंद्राला केली आहे. तीदेखील लवकरच कार्यान्वित होतील.
(शब्दांकन : अतुल कुलकर्णी)