शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची नवी दृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 06:05 IST

ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे. 

ठळक मुद्देअतिशय सुबक आणि प्रवाही भाषेत सांगितलेली कहाणी..

एका अतिशय आव्हानात्मक अशा काळात आपण जगत आहोत. गतीमान जीवनशैली, शिक्षण आणि करिअरमधली जीवघेणी स्पर्धा, छोट्या शहरातून मोठय़ा शहरात होणारं स्थलांतर. अशा अनेक गोष्टींशी सामना करीत असताना, कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन, मदत करावी असं सारखं आपल्याला वाटत असतं. ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे. एका लहान गावातल्या मुलीचा चित्तवेधक प्रवास म्हणजे हे पुस्तक. ही मुलगी गावातून महानगरात जाते, तिथे गेल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी मिळवण्यापासून ते आजपर्यंत अपरिचित असलेल्या जगात स्वत:ची ओळख निर्माण करण्यापर्यंत  अनेक आव्हानांना तोंड देते. कथानायिका अनुराधा भीतीवर मात करत आपले ध्येय कसे साध्य करते, बदल स्वीकारत, विश्वास व्यवस्था बदलत कशी पुढे जाते हा प्रवास लेखिका एका कथेच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडते.अनेकदा आपल्याला न आवडणार्‍या नोकरीमध्ये आपण चिटकून राहतो, नकोशा नातेसंबंधांत अडकून पडतो, याचं कारण पर्याय नसल्याची भीती! भयाचं हेच बंधन आपल्याला कैदेत अडकवून ठेवतं. हीच भीती आपल्या आशेवर पाणी फेरते आपली स्वप्नं उद्ध्वस्त करते. मात्र भीतीवर मात करायची असेल, तर आपल्या विश्वास प्रणालीचा आपण पुनर्विचार केला पाहिजे, हे लेखिका प्रभावीपणे सांगते. त्यामुळे भीती हा एक अडथळा न राहता, स्व-जाणीव आणि नातेसंबंधांतील प्रगतीची ती पायवाट ठरते. वर्तणूक चिकित्सक, मानसिक बदलांच्या अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखिकेने अतिशय सुबक आणि प्रवाही भाषेत सांगितलेली ही कहाणी जणू वाचकांचीच कहाणी आहे. त्यामुळे वाचकाला बांधून ठेवतानाच जीवनाची नवी दृष्टी हे पुस्तक देते. क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड- मेघा दर्डाप्रकाशक- पेनमॅन बुक्स डॉट कॉमपाने- 122, किंमत- 499 रुपये